देश

पश्‍चिम बंगालमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची संख्या मोठी

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्यांतही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची संख्या मोठी असल्याचे आढळले. दुसऱ्या टप्प्यात १७१ पैकी ७९ (४६ टक्के), तर तिसऱ्या टप्प्यात २०५ पैकी ५३ (२६ टक्के) उमेदवारांनी आपल्यावर गंभीर व अतिगंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. 

महिलांवरील अत्याचारांबद्दल ११ जणांवर गुन्हे दाखल आहेत. भाजप, तृणमूल, काँग्रेस-माकप या तिन्ही प्रमुख पक्षांनी २२ ते ५९ टक्के या प्रमाणात कलंकितांना तिकिटे दिली आहे. दुसऱ्या टप्प्यात भाजपचे सर्वाधिक ५७ टक्के म्हणजे ३० पैकी १७ उमेदवार श्रेणीतील आहेत. सर्व टप्प्यांचा विचार केल्यास सर्वपक्षीय गुन्हेगार उमेदवारांचे प्रमाण सरासरी २५ ते ३० टक्के आहे. १९ (११ टक्के) महिला रिंगणात आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पश्‍चिम बंगाल इलेक्‍शन वॉच व एडीआर संस्थेच्या ताज्या अभ्यास पाहणीनुसार दुसऱ्या टप्प्यात ३० पैकी ६ उमेदवारांविरुद्ध बंगाल पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. अत्यंत गंभीर गुन्हे करणाऱ्यांत  भाजपचे सर्वाधिक १६, तृणमूलचे ५, माकपचे ६, बसपा व काँग्रेसचे प्रत्येकी २ अशी वर्गवारी आहे. माकपचे तालडांग्राचे उमेदवार मनोरंजन पात्रा यांच्यावर खून केल्याबद्दल थेट कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. 

दरम्यान, या टप्प्यातील करोडपती उमेदवारांची संख्या फक्त २६ आहे. त्यात तृणमूलचे ११, भाजपचे १०, तृणमूलचे १५ व काँग्रेसचे २ उमेदवार आहेत. 
५ कोटी व त्याहून जास्त संपत्ती जाहीर केलेले ८, २ ते ५ कोटींची संपत्ती असलेले ९ आणि ५० लाख ते २ कोटींपर्यंत संपत्तीधारक ४१ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी केवळ प्रतिज्ञापत्रांतील माहितीचा आधार घेतला आहे. भाजप उमेदवारांची सरासरी संपत्ती २.३१ कोटी, तृणमूल उमेदवारांकडे सरासरी १.७९ कोटींची संपत्ती आहे. पहिल्या तीन करोडपतींमध्ये भाजपच्या भारती घोष (देबरा) १९ कोटींहून जास्त, भाजपचे दीपांकर जाना (काकाद्वीप), १४ कोटींहून जास्त व तृणमूलचे अरूप चक्रवर्ती (तालडांग्रा) ८ कोटी रुपये यांचा समावेश आहे.

तिसऱ्या टप्प्यातही तेच
तिसऱ्या टप्प्यातही ५३ उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. ३१ पैकी ४३ जणांवर अतिगंभीर गुन्हे आहेत. भाजपचे सर्वाधिक म्हणजे ३१ पैकी १९, माकपचे १३ पैकी ८ उमेदवार कलंकित आहेत. ९ उमेदवारांवर महिला अत्याचाराचे, तिघांवर खून केल्याचे व १६ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे आहेत. ८ उमेदवारांविरुद्ध पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded News : नवी दिल्लीतील 'ESTIC 2026' राष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. विजयकुमार जाधव यांची सलग दुसऱ्यांदा निवड!

BCCI Junior Selection Committee: भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाकडे मोठी जबाबदारी! परविंदर अवाना बनले BCCI ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष

Marathi News Live Updates: नाशिक कुंभमेळ्याआधी ५५० जणांचा सामूहिक शंखनाद; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार

Kojagiri Purnima 2026: यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त? जाणून घ्या पूजा विधी आणि पौराणिक कथा

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

SCROLL FOR NEXT