देश

एकाच ठिकाणी अनेक वर्षे नोकरी करताय? तर...

पीटीआय

नवी दिल्ली : जर आपण संपूर्ण करिअरमध्ये एकाच कंपनीसाठी काम करत असाल आणि तसे काम करण्याची इच्छा बाळगत असाल तर तुम्ही स्वत:ला "आउटडेटेड' म्हणजेच जुन्या पिढीचे समजा. ही बाब एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. एकाच ठिकाणी आयुष्यभर काम करणारी मंडळी ही जुन्या जमान्यातील आहेत, असे देशातील 75 टक्के भारतीयांना वाटते. 

पिअर्सन ग्लोबल सर्वेक्षणात एक हजार भारतीय नागरिकांसमवेत 19 देशांतील 16 ते 70 वयोगटातील 11 हजार नागरिकांनी यात सहभाग घेतला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोपे झाले आहे आणि त्याचबरोबर मनोरंजनाचे साधनही उपलब्ध झाले आहे, असे 78 टक्के भारतीयांना वाटते. वयाच्या 58 व्या वर्षी होणारी पारंपरिक निवृत्तीदेखील जुन्या जमान्यातील प्रथा असल्याचे 75 टक्के भारतीयांना वाटते. त्याचवेळी 25 टक्के भारतीयांनी सेवानिवृत्तीनंतर आवडीचे करिअर निवडण्यास प्राधान्य दिले आहे. ज्या क्षेत्रात पदवी, पदविका किंवा उच्चशिक्षण घेतले आहे, त्याच क्षेत्रातील करिअर निवडणाऱ्या भारतीयांचे प्रमाण 84 टक्के आहे, तर 31 टक्के भारतीयांनी काळानुरूप करिअरचा मार्ग बदलला आहे.

औपचारिक शिक्षण चांगले असले तरी ते गरजेचे नसल्याचे 22 टक्के भारतीयांना वाटते, तर 22 टक्के भारतीयांच्या मते औपचारिक शिक्षणाला पूर्वीसारखे आता महत्त्व राहिले नाही. कारण, या शिक्षणाशिवाय यशस्वी होता येते, असे या गटातील नागरिकांचे म्हणणे आहे. देशातील शिक्षण व्यवस्था नव्या पिढीला साजेशी असल्याचे 59 टक्के भारतीयांचे मत आहे. 

निवृत्तीनंतर आवडीचे काम किंवा पार्टटाइम सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार सेवानिवृत्तीनंतर 25 टक्के नागरिक स्वत:चा व्यवसाय अन्य 25 टक्के भारतीय निवृत्तीनंतर आपल्या आवडीचे काम करण्यास उत्सुक आहेत, तर 15 टक्के नागरिकांना अर्धवेळ काम करण्याची तयारी आहे. नोकरीसाठी आणखी शिकण्याची गरज 76 टक्के नागरिकांना वाटते. त्याचबरोबर 78 टक्के नागरिकांना कौशल्य विकास करण्याची गरज वाटते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT