supreme court sakal media
देश

कृषी कायद्यांवर स्थगिती असताना हे आंदोलन कशासाठी? - सुप्रीम कोर्ट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने शेतकरी संघटनांना म्हटलंय की, सध्या तिन्ही कृषी कायद्यांना स्थगिती दिली आहे. तसेच हा अधिनियम देखील लागू नाहीये. तर तुम्ही कशासाठी आंदोलन करत आहात? या कायद्याच्या वैधतेबाबत आव्हान दिल्यानंतर कोर्टाचा दरवाजा ठोठावल्यानंतर विरोध प्रदर्शनाचा प्रश्न उरतोच कुठे? सॉलिसीटर जनरल यांनी म्हटलंय की, जेंव्हा एखादे प्रकरण सर्वोच्च संवैधानिक न्यायालयासमोर असतं तेंव्हा त्या प्रकरणावरुन कुणीही रस्त्यावर उतरू शकत नाही. अटॉर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी लखीमपुर खीरी घटनेचा उल्लेख केला तेंव्हा सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, असं काहीही झाल्याची जबाबदारी कुणीही घेत नाही.

सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेल्या एका याचिकेत म्हटलं गेलं होतं की, शेतकऱ्यांनी चर्चेमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यानंतर या याचिकानंतर शेतकरी संघटनांच्या 43 नेत्यांना नोटीस पाठवली गेली आहे. या व्यतिरिक्त, सर्वोच्च न्यायालयाने दसऱ्याच्या सुट्टीनंतर नोएडाच्या एका रहिवाशाने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करणार असल्याचं म्हटलंय. या याचिकेमध्ये दिल्लीच्या सीमेवरून विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना हटवण्याची मागणी केली आहे.

सुप्रीम कोर्टात आज सोमवारी लखीमपुर खीरीच्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की, जर शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांना न्यायालयात आव्हान दिले आहे तर ते विरोध प्रदर्शन कशासाठी करत आहेत? न्यायालयाने तर या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर बंदी घातली आहे. मग शेतकरी कशाचा विरोध करत आहेत? केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या अटॉर्नी जनरल यांनी म्हटलं की, न्यायालयाने हे सांगितलं पाहिजे की, जर कायद्यावर आधीपासूनच सुनावणी सुरु आहे तर विरोध प्रदर्शन केलं जाऊ शकत नाही. यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत.

अटॉर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी म्हटलं की, काल लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेत 8 लोकांचा मृत्यू झाला. विरोध याप्रकारे असू शकत नाही. यावर जस्टीस खानविलकर यांनी म्हटलं की, आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेची, सार्वजनिक संपत्तीच्या नासधुसीची जबाबदारी कुणीही घेत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गौरी-गणपतीत सोन्याच्या भावात मोठी उलथापालट! 2 दिवसांत ₹30 हजार... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय?

Mumbai Local Megablock: गणेशोत्सवात मेगाब्लॉकचे विघ्न नाही, प्रवाशांना दिलासा; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

iPhoneचा भंडारा! Apple फोनचे मोफत वाटप, २२ सप्टेंबरला आयोजन; कुठे आणि कोण देणार? पाहा VIDEO

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

Chhatrapati Sambhajinagar Accident News: दुचाकीला कट लागल्याने रस्त्यावर कोसळला तरुण; मागून आलेल्या सिमेंट मिक्सरखाली आल्याने जागीच प्राण गमावले

SCROLL FOR NEXT