disha ravi. 
देश

Toolkit Case: दिशा रवी आहे कोण? ग्रेटा थनबर्ग आणि तिचं काय कनेक्शन? पाहा व्हिडिओ

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- 22 वर्षीय क्लायमेंट अॅक्टिविस्ट दिशा रवि सध्या चर्चेत आलीये. काही दिवसांपूर्वी ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाप्रकरणी सोशल मीडियावर एक टूलकिट शेअर केलं होतं. त्यानंतर तिने ते टूलकिट डिलिट केलं, पण याच प्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी दिशा रविला अटक केलीय. तिच्या या अटकेमुळे राजकीय वातावरण तापताना दिसतंय. याच पार्श्वभूमीवर चर्चेत आलेली दिशा रवी नेमकं आहे कोण आणि तिचं आणि ग्रेटाचं काय कनेक्शन आहे हे आपण पाहुया...

दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम यूनिटने शनिवारी दिशा रवीला तिच्या बेंगळुरी स्थित घरुन अटक केली. पोलिसांचं म्हणणंय की, दिशा रवीने स्वीडनची क्लायमेंट अॅक्टिविस्ट ग्रेटा थनबर्गला टूलकिट पुरवलं होतं आणि तीच या पूर्ण प्रकरणाची मुख्य सूत्रधार आहे. त्यामुळेच दिल्लीत 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारप्रकरणासोबत दिशा रवीच्या अटकेला जोडून पाहिलं जातंय. 

'ते' घाबरलेत, देश नाही; दिशा रवीच्या अटकेवरुन राहुल गांधींचा सरकारवर...

दिल्ली पोलिसांनी ट्विट करुन सांगितलंय की, दिशा रवीने एक व्हॉट्सऍप ग्रुप सुरु केला होता. तसेच तिने टूलकिट डॉक्युमेंट तयार करण्यासाठी मदत केली होती. डॉक्युमेंटचा ड्राफ्ट तयार करण्यामध्ये तिची महत्त्वाची भूमिका आहे. पोलिसांनी असाही दावा केलाय की, या संपूर्ण प्रक्रियेत सर्वांनी मिळून खलिस्तानी समर्थक पोएटिक जस्टिस फाऊंडेशनसोबत काम केलंय आणि भारत सरकारविरोधात वातावरण खराब करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.  

कोण आहे दिशा रवि आणि ग्रेटासोबत तिचं काय कनेक्शन 

बेंगळुरुच्या माऊंट कार्मेल स्कूलची ग्रॅज्युएट असणारी 22 वर्षीय दिशा रवि क्लायमेट अॅक्टिविस्ट ग्रुफ Fridays for Future ची सदस्य आहे. या ग्रुपची सुरुवात 2018 मध्ये ग्रेटा थनबर्गने केली होती. त्यानंतर 2019 मध्ये दिशा रवीने या संघटनेची भारतात शाखा सुरु केली. तसेच या शाखेची प्रमुख म्हणूनही ती काम करत होती. क्लायमेंट चेंजबाबत दिशा रवीने अनेक लेखही लिहिलेत. 

दिशा रविला कुठून मिळाली प्रेरणा

दिशा रवीचं म्हणणं आहे की, तिचे आजी-आजोबा शेतकरी होते आणि क्लायमेंट चेंजच्या समस्येशी झगडत होते. येथूनच तिला या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली. दिशा रविच्या एका मित्रानं सांगितलं की ती क्लायमेंट चेंजसंबंधी खूप सक्रिय होती. क्लायमेंटमध्ये होणाऱ्या बदलांना रोखण्यासाठी ती जागरुकता निर्माण करण्याचं काम करायची.  

दिशा रविवर नेमकं काय आहेत आरोप?

दिल्ली पोलिसांनी दिशा रविवर देशद्रोह, हिंसेला खतपाणी घालणे, गुन्हेगारी कट रचने याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. टूलकिट तयार करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी तिच्याविरोधात हे गुन्हे दाखल झालेत. रविवारी न्यायालयाने दिशा रविला 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्याचा आदेश दिलाय. त्यामुळे तिच्या अडचणी वाढल्यात.

शेतकरी आंदोलनावर ट्विट करणाऱ्या ग्रेटा थनबर्गने एक गूगल डॉक्युमेंट शेअर केलं होतं, त्याचं नाव टूलकिट होतं. यात शेतकरी आंदोलनासंबंधी एक ऍक्शन प्लॅन सांगण्यात आला होता, ज्यात शेतकरी आंदोलनाचा मुद्दा कसा तापवला जावा आणि सोशल मीडियावर परसेप्शन कसा बदलला जाईल याबाबत उल्लेख करण्यात आला होता. या टूलकिटप्रकरणी मंत्रालयाने म्हटलं होतं की, भारताच्या बाहेर कशाप्रकारे शेतकरी आंदोलनाबाबत भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय हे यावरुन स्पष्ट होतंय. 

दिशा रविच्या अटकेवरुन राजकीय वातावरण तापताना दिसतंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी सवाल केलाय की,  शेतकऱ्यांचे समर्थन करणारे टूलकिट भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करणाऱ्या चीनपेक्षा धोकादायक आहे का? तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या कृतीला लोकशाहीवर अभूतपूर्व हल्ला म्हटलंय. या अटकेवर काँग्रेस नेते शशी थरुर, कम्युनिस्ट नेते सिताराम येच्यूरी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासहित अनेकांनी रोष व्यक्त केलाय. त्यामुळे हे प्रकरण पुढे काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

(edited by- kartik pujari)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT