एकीकडे भारताला इंग्रजांच्या राजेशाहीतून स्वातंत्र्य मिळाले तर दुसरीकडे भारताला त्याचा एक भागही गमवावा लागला. ज्याला पाकिस्तानच्या नावाने ओळखळल्या जातं. जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा अनेक लोकांना त्यांचं वडिलोपार्जीत घर आणि संपत्ती सोडत देशाला अलविदा म्हणावं लागलं होतं. यामध्ये देशाच्या साधारण घराण्यांसह श्रीमंत घराण्यांचाही समावेश होता. (know the history of Sir Gangaram)
आजही पाकिस्तानमध्ये अनेक भारतीय घरे आणि इमारती आहेत. तर काही काळानुरूप नष्ट झाल्या. मात्र सर गंगाराम यांचं नाव भारतासह पाकिस्तानमध्येगही कसं जिवंत आहे त्याचा इतिहास आपण जाणून घेऊया. सर गंगाराम हे त्यांच्या काळातले मोठे समाजसेवी आणि इंजीनियर होते. त्यांच्या इंजिनीयरींगमध्ये घेतलेल्या अभ्यासाचा पूरेपूर विकास त्यांनी लाहोरच्या विकासात केला. लाहोर शहराला त्यांच्या कारकीर्दीने नवं रूप दिलं. सर गंगाराम यांनी लाहोर म्यूझियम, नॅशनल पार्क ऑफ आर्ट्स, द एचिसन कॉलेज आणि मुख्य डाकघर यांसारख्या इमारतींना डिझाइन देण्याचं काम त्यांनी केलं.
रिटायर्मेंटनंतर ते त्यांच्या गावी पंजाबला परतले. त्यांच्या कार्यासाठी शासनाने त्यांना चेनाब कॉलनीमध्ये त्यांनी जमीन दिली होती. आधुनिक सिंचनाची नवी कल्पना रूजू करण्याऱ्या गावाचा आदर्श त्यांनी जगासमोर ठेवला. ज्याचे नाव आहे गंगापुर. तसेच या गावाला रेल्वेने जोडण्यासाठी त्यांनी परिवहन व्यवस्थेचं निर्माण केलं.
‘हार्वेस्ट फ्रॉम द डेजर्ट: द लाइफ़ एंड वर्क ऑफ़ सर गंगा राम’ नावाच्या एका पुस्तकात त्यांचा उल्लेख हिंदू समाजातील विधवा महिलांच्या हक्कसाठी आवाज उठवणारा म्हणून उल्लेख केलाय. १९२१ मध्ये त्यांनी विधवा महिलांसाठी आश्रन बांधलं ज्यामध्ये शाळेचाही समावेश होता. त्यांची उल्लेखनीय कामगिरी बघता एका ट्रस्टने त्यांच्या नावाने लाहोर शहरात मोफत रूग्णालयाची स्थापना केली.
१९२७ मध्ये सर गंगाराम यांचं लंडनमध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानतर त्यांची काही प्रमाणात राखळ लाहोरमध्ये आणल्या गेली होती. त्यांनी काढलेल्या आश्रमाजवळ ही राखळ गाळण्यात आली होती. आजही त्यांची समाधी तुम्हाला तिथे बघायला मिळेल. देशाची फाळणी झाली तेव्हा गंगाराम यांचं कुटुंब पाकिस्तानच्या लाहोरमधून दिल्लीत आले. दिल्लीमध्येही त्यांच्या नावाने Sir Ganga Ram Hospital आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.