tushar priti deshmukh as ashish shelar takling about  
देश

आशिष शेलारांनी भाषणात उल्लेख केलेला तुषार प्रिती देशमुख कोण आहे ?

१९९३ साली झालेल्या बॉंबस्फोटात तुषारच्या आईचे निधन झाले

सकाळ डिजिटल टीम

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाले आहे. भाजपचे नेते यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. दाऊद इब्राहिमचे संबंध असल्याच्या कारणावरून भाजप नेते सरकारवर टीका करत आहेद. यावेळी आशिष शेलारांनी १९९३ च्या बॉंबस्फोटात बळी गेलेल्या लोकांचा उल्लेख केला. त्यात तुषार प्रिती देशमुख यांच्या आईचाही उल्लेख केला. आशिष शेलारांनी भाषणात उल्लेख केलेला तुषार हा लोकप्रिय शेफ आहे.

तुषारच्या आई प्रिती देशमुख १९९३ साली मुंबईच्या पेडर रोडवर कॅन्टीन चालवत असतं. बॉंबस्फोटाच्या दिवशी बस पकडून घरी येत असताना बस वरळीच्या सॅंचुरी बाजार बस स्टॉपवर थांबली. एक टॅक्सी बसच्या पुढे ऊभी होती. त्यााच टॅक्सीतून क्षणार्धात स्फोट होऊन होत्याचं नव्हतं झालं. त्या स्फोटात तुषारची आई गेली तेव्हा तो १० वर्षांचा होता. त्या दु:खातून सावरायला त्याला प्रचंड वेळ लागला. मोठ होताना त्याच्यासारख्या इतर लोकांनाही या स्फोटाचा फटका बसल्याचं त्याला लक्षात आलं. या विरोधात त्याने आवाज उठवायचं ठरवंल. त्यानंतर विविध चॅनन्स, वृत्तपत्राच्या माध्यमातून दाऊद आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली पाहिजे अशी सातत्याने त्याने मागणी केली. दादरला सह्यांची मोहिमही राबवली. राज्याच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांपर्यंत त्याने हा प्रश्न हिरिहिरीने मांडला. त्याच्या या आवाजामुळे त्याला धमक्यांचे अनेक फोन आले. तरीही तो न डगमगता आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे यासाठी अजूनही झटतो आहे.

मित्राच्या घरी वाढला

बॉम्बस्फोटात आईचे निधन झाल्यावर वडिलांनी दुसरे लग्न केले. पण त्या आईचे तुषारशी पटलेच नाही. घरकाम, कपडे, भांडी अशी सगळी कामे तोच करत असे. वडिलांना त्याची कल्पना नव्हती. पण पुढे काही गोष्टींमुळे वडिलांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याने १० नंतर कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहायला सुरूवात केली. हॉस्टेलवरही त्याला प्रसंगी फक्त वडापाव खाऊन दिवस काढावे लागले. मग त्याची ओळख दादरमध्ये राहणाऱ्या योगेश म्हात्रेशी झाली. तेथे जाणे त्याच्या आईशी गप्पा मारणे, तिच्या हातचे पदार्थ खाणे त्याला आवडू लागले. त्या घराचा त्याला लळा लागला. योगेशने आईला नीना म्हात्रे यांना तुषार आपल्याकडे कायमचा राहू देत का असे विचारले. त्यानंतर जवळपास ३० वर्ष तो या कुटूंबाबरोबरच राहतो आहे. त्याचे या कुटूंबाशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे. तुषारसाठी नीना म्हात्रे यांनी सख्या मुलाप्रमाणे प्रेम केले आहे.

आईचं स्वप्न केलं पूर्ण

आपल्या मुलाने शेफ व्हावे असे तुषारच्या आईला वाटायचे. त्याप्रमाणे त्याने तिचे स्वप्न पूर्ण केले आहे. तो विविध कार्यक्रमांमधून आपल्या रेसिपीज दाखवत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT