Madvi Hidma 
देश

Bijapur Maoist Attack: नक्षलवादी हल्ल्यामागील 'मास्टरमाईंड' हिडमा कोण आहे?

सकाळन्यूजनेटवर्क

रायपूर- छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात 24 जवान शहीद (bijapur encounter news) झाले आहेत. जवानांवर झालेल्या या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून नक्षलवाद्यांविरोधातील लढाई अधिक तीव्र होणार असल्याचं म्हटलंय. सुकमा-बिजापूर सीमेदरम्यान झालेल्या या हल्ल्यामागे कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमा असल्याचं सांगितलं जातंय. हिडमाला पकडण्यासाठी जवानांनी त्यांच्या क्षेत्रात प्रवेश केला होता. 2000 जवानांची टीम वेगवेगळ्या भागात हिडमाच्या टीमला पकडण्याठी जंगलात शिरली होती. सुरुवातीला नक्षलवाद्यांनी जवानांना जंगलात शिरु दिलं, त्यांना कोणीही डिस्टर्ब केलं नाही. सुरक्षा दलांची टीम अनेक भागात विखुरलेली होती. एका टीमला हिडमाच्या बटालियनने  (naxali hidma) आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर जवानांची घेराबंदी करुन त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. माहितीनुसार, हिडमाच्या बटालियनने जवानांना तीन बाजूंनी घेरलं होतं. जवान घनदाट जंगलात अडकले होते आणि हिडमाची बटालियन डोंगरावरुन गोळीबार करत होती. 

कोण आहे माडवी हिडमा?

हिडमा दंडकारण्याच्या जंगलात सक्रीय आहे. हिडमाचे लेटेस्ट असे कोणतेही फोटो नाहीत, तो ४० वर्षांचा असल्याचं सांगितलं जातं. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील तो एक आदिवाशी आहे. ३ एप्रिलला झालेल्या हल्ल्यामागील तो मास्टरमाईंड असल्याचं बोललं जातं. हिडमा हा पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी बलाटीयन नं. १ चा एरिया कमांडर आहे. सुकमा जिल्यात सक्रीय असणाऱ्या CPI (Maoist) दंडकारण्य स्पेशल झोन कमीटीचा तो सदस्य आहे. त्याच्यावर ४० लाखांचे बक्षीस ठेवण्यात आलंय.

सुकमा जिल्ह्यातील पुर्वटी गावात त्याचा जन्म झाल्याचं सांगितलं जातं. बस्तरमधील नक्षलवादी चळवळीचा तो चेहरा आहे. तो परिसरात हिदमालू आणि संतोष नावानेही ओळखला जातो. माहितीनुसार, १० वीपर्यंत शिकल्यानंतर त्याने नक्षलवादाची वाट धरली. थोड्यावेळातच तो गोरिला युद्धामधील प्रमुख रणनीतीकारण झाला आहे. नागरिकांच्या माहितीनुसार. सुकमा-बिजापूर येथे झालेल्या हल्ल्याच्या दरम्यान हिडमा त्याठिकाणी उपस्थित होता. असे असले तरी याबाबत अधिकृत माहिती नाही. 

मागील वर्षात झालेल्या काही नक्षलवादी हल्ल्यामध्ये त्याचा सहभाग होता. सुरक्षा दल दंडकारण्यात अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांशी लढा देत आहेत. सुकमा, बिजापूर, कोंडगाव, कंकर, नारायणपूर, दंतेवाडा आणि जगदलपूरमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव जास्त आहे. २०१० मध्ये नक्षलवाद्यांनी सर्वात भीषण हल्ला केला होता. यात सीआरपीएफचे ७६ जवान शहीद झाले होते. दंतेवाडामध्ये हा हल्ला झाला होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press : १४ मिनिटांत १२ मतदारांची नावे वगळणाऱ्या सूर्यकांतला राहुल गांधींनी थेट स्टेजवरच आणले...खुलासा ऐकून सगळेच अवाक्

हायड्रोजन बॉम्ब अजून बाकी, इलेक्शन कमिशनमधूनच मिळतेय मदत; राहुल गांधी काय म्हणाले?

Windows 10 : ऑक्टोबर महिन्यांपासून बंद होणार विंडोज 10 चा फ्री सपोर्ट; लाखो वापरकर्त्यांचा डेटा धोक्यात, आता काय करावं? जाणून घ्या

Fake Massege Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाची बनावट मेसेजद्वारे फसवणूक, अब्दुललाटच्या दोघांवर गुन्हा; का आहे नेमकं प्रकरण?

Baba Adhav : ...अन्यथा राज्यव्यापी जेल भरो आंदोलन, डॉ. बाबा आढाव; माथाडी कायद्यातील दुरुस्त्या मागे घेण्याची मागणी

SCROLL FOR NEXT