maha to kerala 
देश

महाराष्ट्र ते केरळ एक वर्ष लागलं मग जहाजाने का नाही नेलं? वाचा कारण

सूरज यादव

तिरुवनंतपुरम - सध्या सोशल मीडियावर एका ट्रकला महाराष्ट्र ते केरळ असा 1700 किमी प्रवास करायला एक वर्ष लागल्याची चर्चा होत आहे. महाराष्ट्रातील नाशिकमधून केऱळच्या तिरुवनंतपुरम इथं एअरोस्पेस ऑटोक्लेव या ट्रकमधून नेण्यात आलं होतं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात नाशिकमधून ट्रकचा प्रवास सुरु झाला होता. तो 19 जुलै 2020 ला केरळमध्ये पोहोचला. याचे फोटो एएनआयने शेअर केले होते. 38 चाके असलेल्या या ट्रकमध्ये 70 टनांहून अधिक वजन असलेलं एअरोस्पेस ऑटोक्लेव पोहोचवण्यासाठी एक वर्ष इतका काळ लागला. या ऑटोक्लेवचा वापर एअरोस्पेस प्रोडक्टच्या निर्मितीसाठी केला जातो. 

याबाबत ट्रकच्या कर्मचाऱ्याने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, 8 जुलै 2019 रोजी महाराष्ट्रातील नाशिक इथून प्रवास सुरु झाला होता. चार राज्यांतून प्रवास करत तिरुवनंतपुरममध्ये पोहोचायला एक वर्ष लागलं. 1700 किमीचा प्रवास पूर्ण करताना दररोज फक्त 5 किमी अंतर कापले जायचे. यावेळी रस्त्यावरून इतर वाहतूक पूर्ण बंद केली जात असे. 

महाराष्ट्रातून केरळला जात असताना या ट्रकसोबत नेहमी 32 जण असायचे. यात इंजिनिअर्स, मेकॅनिक यांचा समावेश होता. ट्रकच्या मार्गात येणाऱे अडथळे दूर करण्यासाठी काही लोक सोबत होते. तसंच सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची गाडीही होती. ट्रकमध्ये 7.5 मीटर उंच ऑटोक्लेव असल्यानं अनेक ठिकाणी रस्त्यात झाडांच्या फांद्या आणि वीजेच्या तारा यायच्या. त्या बाजुला करण्यासाठी एक पथक ट्रकसोबत असायचं. इतका अडथळा पार करत रविवारी ऑटोक्लेव सुरक्षितपणे केरळमध्ये पोहोचलं. 

दरम्यान, मशिन मालवाहू जहाजाने का नेलं नाही? जहाजातून ते आणखी कमी वेळेत पोहोचलं असंत असं म्हटलं जातं आहे. पण ऑटोक्लेवचा आकार मोठा असल्यानं त्याची वाहतूक करणं हे एक आव्हानच होतं. ज्या ट्रकमध्ये हे ऑटोक्लेव लादून नेलं त्याची वाहतूक करत असताना वाटेत येणाऱे घाट किंवा इतर अडचणी या बाबीही महत्वाच्या होत्या. तसंच ऑटोक्लेवची उंची जास्त असल्यानं जहाजातून ते नेण्यात आलं नाही अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे. जहाजाने न्यायचं झालं तर ते मुंबईपर्यंत रस्त्यानेच न्यावं लागलं असतं. त्यासाठी घाटरस्त्याचा मोठा अडथळा होता. भलामोठा ट्रक घाटातून घेऊन जाणं अशक्य होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Anti-India Rally : बांग्लादेशात कट्टरपंथियांकडून भारतविरोधी रॅली, प्रसिद्ध हिंदू मंदिरावर बंदी घालण्याची मागणी

Mumbai News: छटपूजेसाठी पालिका सज्ज! मुंबईत ६७ ठिकाणी नियोजन; विविध सुविधा उपलब्ध

CPR Kolhapur Crime : वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली बिर्याणी-नाश्ता! सीपीआर रुग्णालयात संशयितांना मिळते व्हीआयपी वागणूक?, सुरक्षा यंत्रणा मूग गिळून गप्प...

Latest Marathi News Live Update : नाशिक मुंबई महामार्गावरील इंदिरानगर बोगदा सोमवारपासून ९ महिन्यांसाठी राहणार बंद

“सलमानसोबत पुन्हा काम नाही!” ‘अंतिम’च्या सेटवर झाला होता वाद! महेश मांजरेकरांनी उघड केली सलमान खानची खरी बाजू!

SCROLL FOR NEXT