Republic Day google
देश

Republic Day : 'संविधान जाळणारा मी पहिला असेन', असं डॉ. आंबेडकर का म्हणाले होते ?

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही एक वेळ अशी आली होती की याच संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे संविधान जाळून टाकावेसे वाटत होते.

नमिता धुरी

मुंबई : भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पारित करण्यात आले. त्यामुळे हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.

हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी देशभर लागू करण्यात आले. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज संविधानाबाबत काही विशेष गोष्टी जाणून घेऊ या.

२६ जानेवारी १९३० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने भारताला संपूर्ण स्वराज्य म्हणून घोषित केले होते. म्हणूनच ही तारीख संविधान लागू करण्यासाठी निवडण्यात आली. हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही एक वेळ अशी आली होती की याच संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे संविधान जाळून टाकावेसे वाटत होते. पण बाबासाहेबांवर ही वेळ का आली ?

२ सप्टेंबर १९५३ रोजी राज्यपालांचे अधिकार वाढवण्यावरून राज्यसभेत खडाजंगी सुरू होती. यावेळी बाबासाहेब अल्पसंख्यांकांच्या अधिकारांबद्दल जागरूक होते.

तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते, "बहुसंख्यांक आपल्याला त्रास देतील अशी भीती अल्पसंख्यांकांच्या मनात नेहमी असते. अल्पसंख्यांकांना महत्त्व देऊ नका असे बहुसंख्यांक कधीही म्हणू शकत नाहीत.

यामुळे लोकशाहीचे केवळ नुकसानच होईल. मी हे संविधान तयार केले आहे असे लोक म्हणतात, पण हे संविधान जाळणाराही मीच पहिला असेन. "

आपल्या विधानाचे समर्थन करण्यासाठी बाबासाहेबांनी एक उदाहरण दिले होते. ते म्हणाले होती की, "आपण देवासाठी मंदिर बांधलं. पण देवांची प्रतिष्ठापना करण्यापूर्वीच तेथे राक्षस येऊन राहू लागले तर ते मंदिर तोडून टाकण्याशिवाय पर्याय नसतो. "

संविधानात आतापर्यंत १०५ वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. १९७६ सालची ४२वी घटनादुरुस्ती अधिक प्रसिद्ध आहे. यावेळी संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि अखंड हे तीन शब्द जोडण्यात आले.

भारतीय संविधान हे जगातील सर्वांत दीर्घ स्वरुपाचे संविधान आहे. यात २५ भाग, १२ अनुसूची आणि ४४८ अनुच्छेद आहेत.

२४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेच्या २८४ सदस्यांनी संविधानावर स्वाक्षरी केली होती. यात दुर्गाबाई देशमुख, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, अम्मू स्वामिनाथन, दक्षिणायिनी वेलायुदन, बेगम रायसुल, इत्यादी १५ महिलांचा समावेश होता.

भारतीय संविधान कॅलिग्रॉफर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी त्यांच्या हस्ते अक्षरकलेद्वारे साकारले आहे. हे लेखन करण्यासाठी त्यांना ६ महिने लागले.

प्रेम बिहारी यांनी त्यासाठी एकही रुपया मानधन घेतले नव्हते. त्यांनी फक्त प्रत्येक पानावर आपले आणि आजोबांचे नाव लिहिण्याची परवानगी मागितली होती.

भारतीय संविधान तयार करण्यासाठी ६०हून अधिक देशांच्या राज्यघटनांचा आधार घेतला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT