LGBTQ esakal
देश

Supreme Court of India : Transgenders, समलैंगिक आणि वेश्यांच्या रक्तदानावर बंदी का? केंद्र म्हणतं...

अशा समस्यांकडे केवळ वैयक्तिक अधिकाराच्या दृष्टिकोनातून न पाहता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

रक्तदाता निवड मार्गदर्शक तत्त्वांना आव्हान देणाऱ्या याचिकेला उत्तर देताना केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. ट्रान्सजेंडर, समलैंगिक आणि वेश्यांना रक्तदानापासून दूर ठेवण्यात आले आहे, असं केंद्राने आपल्या याचिकेत म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की, पुरेशा वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे, विविध अभ्यासानुसार, अशा लोकांमध्ये एचआयव्ही आणि हिपॅटायटीस बी किंवा सीचे प्रमाण जास्त आहे. केंद्र सरकारने हे प्रतिज्ञापत्र 'थंगजाम सांता सिंग विरुद्ध भारत आणि इतर' प्रकरणात दाखल केलं आहे.

केंद्र सरकारने म्हटलं आहे की तज्ज्ञांनी दोन प्रकारच्या लोकांना रक्तदानातून वगळण्याची शिफारस केली आहे. समलिंगी पुरुषांना अशाच प्रकारे अनेक युरोपीय देशांमध्ये रक्तदान करण्यापासून वगळण्यात आले आहे.

अशा समस्यांकडे केवळ वैयक्तिक अधिकाराच्या दृष्टिकोनातून न पाहता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT