Covaxin,Covishield ,Sputnik V  
देश

Covaxinची किंमत Covishield आणि Sputnik V पेक्षा जास्त का?

...म्हणून Covaxinची किंमत आहे सर्वात जास्त

शर्वरी जोशी

संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर अद्यापही कोणतं ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर लस घेणं हा एकच पर्याय सर्वांसमोर आहे. सध्या भारताकडे लसींचे तीन पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही (Sputnik V), ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाची लस कोविशील्ड (Covishield) आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (Covaxin) या तीन लशींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या तीनही लसींची किंमत वेगवेगळी असून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची (Covaxin) किंमत सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळतं. म्हणूनच, कोव्हॅक्सिनची किंमत इतकी जास्त का असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला असून त्याचं उत्तर आता विशेषज्ञांनी दिलं आहे. (why-covaxin-is-costier-than-covishield-and-sputnik-v)

कोविशील्डच्या एका डोसाची किंमत ७८० रुपये आहे. तर, स्पुटनिक व्ही ची किंमत साधारणपणे १ हजार,१४५ रुपये आहे. त्याचबरोबर कोव्हॅक्सिनची किंमत १ हजार ४१० रुपये आहे. विशेष म्हणजे कोव्हॅक्सिनची किंमत ही विदेशी बनावटीच्या Pfizer च्या किंमती इतकीच असून हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात महाग कोरोना व्हॅक्सीन आहे.

Covaxin ची किंमत इतकी जास्त का?

"Covaxin तयार करण्यासाठी आलेला खर्च अधिक आहे. Covaxin तयार करण्यासाठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञानही Covishield आणि Sputnik पेक्षा वेगळं आहे. Covaxin तयार करण्यासाठी पूर्णपणे निष्क्रिय झालेल्या विषाणूचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी शेकडो लीटर महाग असलेल्या सिरमची आयात करावी लागते. तसंच हा विषाणू हाताळत असतांना प्रचंड काळजी घ्यावी लागते. त्यासाठी या विषाणूवर सिरमसोबत BSL लॅबमध्ये प्रक्रिया केली जाते व त्यानंतर त्याला निष्क्रिय केलं जातं", असं सेंटर फॉ सेल्युलर अॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजीचे सल्लागार राकेश मिश्रा यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, "Covaxin ची किंमत Covishield पेक्षा जवळपास दुप्पट आहे. पण, Covishield आणि Sputnik च्या किंमती वेगवेगळ्या का आहेत? यामागेच व्यावसायिक कारण असू शकतं. तंत्रज्ञानाचा विचार केला तर mRNA व्हॅक्सीन सर्वात स्वस्त आणि सोपं आहे. त्यासाठी जास्त सुविधांची आवश्यकता भासत नाही. Pfizer and Moderna हे mRNA चंच वॅक्सीन आहेत. यात जीवंत विषाणूचा उपयोग केला जात नसून त्याऐवजी एका प्रोटीन spike protein चा वापर करतात. जो विषाणूच्या पटलांवर आढळून येतो. या व्हॅक्सीनमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते."

दरम्यान, २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये लशींच्या किंमतीत बरीचशी घट झाल्याचं मत विशेषज्ञांचं आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल (Niti Aayog member) यांनी अलिकडेच केंद्र सरकारच्या लशीकरणासंदर्भातील योजनेची रुपरेषा सांगितली आहे. त्यानुसार,सरकार एकूण आठ लशींद्वारे भारतातील सर्व नागरिकांचे 2021 वर्षाच्या अखेरपर्यंत लसीकरण (COVID-19 vaccines) करण्याच्या नियोजनात आहे. यासाठी बायोलॉजिकल ई, झायडस कॅडिला, नोवाव्हॅक्ससाठी सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडिया, नेझल व्हॅक्सिनसाठी भारत बायोटेक आणि स्पुटनिक व्ही (Biological E, Zydus Cadila, Serum Institute of India for Novavax, Bharat Biotech nasal vaccine, Gennova and Sputnik V) या लशींच्या आपत्कालीन वापरसाठी मान्यता तसेच लस उत्पादनात वाढ करण्यावर जोर दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT