kisan ekta morcha 
देश

किसान एकता मोर्चाचं पेज ब्लॉक का केलं? फेसबुकनं दिलं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी संघटनांपैकी अनेक शेतकरी संघटनांनी सोशल मीडियावर त्यांचं अकाउंट तयार केलं आहे. यापैकी किसान एकता मोर्चाच्या पेजला रविवारी ब्लॉक करण्यात आलं होतं. किसान एकता मोर्चाच्या पेजचे 7 लाख फॉलोअर्स झाले असून त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवरसुद्धा त्यांच्या कंटेंटवर बंदी घातल्याचा दावा केला होता. आता फेसबुकने या सर्व प्रकारावर सोमवारी स्पष्टीकरण दिलं आहे. 

फेसबुकने म्हटलं की, आमच्या रिव्ह्यूमध्ये असं समोर आलं की, ऑटोमेटेड सिस्टमला www.facebook.com/kisanektamorcha फेसबुक पेजवर वेगाने अपडेट झाल्याचं बघायला मिळालं. यानंतर सिस्टिमने पेजला स्पॅम केलं. हे कम्युनिटी स्टँडर्डचं उल्लंघन आङे. जेव्हा सर्व प्रकार समजला तेव्हा तीन तासांच्या आत रिस्टोअर करण्यात आलं होतं. रिव्ह्यूमध्ये दिसतं की ऑटोमेटेड सिस्टिमने फक्त फेसबुक पेजला ब्लॉक केलं होतं. यामुळे इन्स्टाग्रामवर काही परिणाम झाला नव्हता. 

फेसबुक प्रवक्त्यांनी सांगितलं की, स्पॅम विरोधात आमचं काम हे ऑटोमॅटिक असतं. याची ओळख behaivour pattern पाहून केली जाते. उदाहरणासाठी जर एखाद्या अकाउंटवरून एका पाठोपाठ एक पोस्ट्स होत असतील तर सामान्यपणे हे चुकीचं असल्याचं सिस्टिम दाखवते. अशावेळी काही ठिकाणी आमची ह्यूमन रिव्ह्यू टीम काम करते. 

रविवारी किसान एकता मोर्चाच्या एका फेसबुक लाइव्हचं प्रसारण रोखण्यात आलं होतं. त्यानंतर पेजसुद्धा ब्लॉक झालं होतं. तेव्हा संघटनेनं आरोप केला की, त्यांच्या सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे पुन्हा एकदा देशातील फेसबुकची भूमिका आणि ऑनलाइन सेन्सॉरशिपवरून वाद विवाद सुरू झाला होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : मानसिकदृष्ट्या असमर्थ महिलेवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT