indian currency 
देश

भारतीय नोटेवर गांधीजींचा फोटो का? जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांत भारतात चलनी नोटांमध्ये मोठा बदल झाला आहे. 2016 मध्ये तर नोटबंदीने 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्या आणि त्यानंतर 10 रुपयांपासून 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या. मात्र गेल्या काही वर्षांत नोटांवर असलेलं महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे चित्र बदललं नाही. गांधीजींचा हा फोटो नोटेवर 1996 मध्ये आल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर 5, 10, 20, 100, 500 आणि 1000  रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या. दरम्यान तोपर्यंत अशोक स्तंभाच्या जागी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो आणि नोटेच्या एका बाजूला खाली अशोक स्तंभ छापला. 

1996 च्या आधी 1987 मध्ये महात्मा गांधींचा फोटो वॉटरमार्कच्या स्वरुपात वापरला जात होता. तो नोटेच्या डाव्या बाजुला होता. मात्र त्यानंतर प्रत्येक नोटेवर गांधीजींचा फोटो छापला जातो. माहितीच्या अधिकारा अंतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार, 1993 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटेच्या उजव्या बाजुला महात्मा गांधींचा फोटो छापण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. गांधीजींच्या फोटोवरून अनेकदा प्रश्न विचारले गेले की इतर स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो का छापले नाहीत. 

भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. विविध राज्ये, भाषा, प्रादेशिक अस्मिता आहे. या देशात महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता असं संबोधलं जातं. स्वातंत्र्य लढाईवेळी गांधीजी देशाचा चेहरा होते आणि त्यामुळेच त्यांच्या फोटोबाबत एकमत झाले. कारण इतर स्वातंत्र्य सैनिकांबाबत प्रादेशिक वाद निर्माण होण्याची शक्यता होती. यासाठीच गांधीजींचा  फोटो छापण्याचा निर्णय घेतला गेला. 

नोटेवर गांधीजींच्या चित्रावरून याआधी जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारला होता तेव्हा तत्कालीन अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिलं होतं. अरुण जेटली म्हणाले होते की, रिझर्व्ह बँक इंडियाच्या पॅनलनं गांधीजींच्या ऐवजी इतर कोणत्याही राष्ट्रीय नेत्याचा फोटो न छापण्याचा निर्णय घेतला आहे. कारण महात्मा गांधी यांच्याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती देशाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही.  

महात्मा गांधींचा नोटेवर असलेला फोटो हा पोर्ट्रेट असल्याचं वाटतं. मात्र हा फोटो गांधीजींच्या एका फुल साइज फोटोवरून घेण्यात आला आहे. 1946 साली हा फोटो लॉर्ड फ्रेडरिक पॅथिक लॉरेन्स व्हिक्ट्री हाउसमध्ये आले होते तेव्हा टिपण्यात आला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

Yavatmal Healthcare: १०२ वर वारंवार फोन, तरी रुग्णवाहिका आली नाही; राळेगावात जंगलातच महिलेची प्रसूती

Marathi News Live Updates : लोहगावमध्ये रस्त्यावरील खड्ड्याला चक्क चिकटपट्टी लावून पुणेकराचे अनोखे आंदोलन, महापालिकेच्या कारभाराचा जाहीर निषेध

दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

SCROLL FOR NEXT