Wife cannot be forced to live in matrimonial home while husband keeps another lady Himachal Pradesh HC  
देश

High Court : पतीने परस्त्री घरात आणली तर पत्नीला.…; हिमाचल प्रदेश हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

रोहित कणसे

पतीने दुसरी स्त्री सोबत ठेवली असताना कोणत्याही पत्नीला वैवाहिक घरात राहण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. एका व्यक्तीने त्याला त्याच्या पत्नीने आधीच सोडले असल्याचा दावा केल्या प्रकरणी कोर्टाने कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले आहे.

या प्रकरणात न्यायमूर्ती सत्येन वैद्य यांनी सोडून देणे आणि क्रूरतेच्या आरोपांवरून घटस्फोटाच्या मागणीची पतीची याचिका फेटाळून लावली आहे. प्रतिवादीकडे (पत्नी) वेगळे राहण्याचे न्याय्य कारण होते कारण कोणत्याही पत्नीला पतीने दुसरी स्त्री सोबत ठेवल्यास विवाहा झाला त्या घरात राहण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही , असे न्यायालयाने म्हटले आहे.

कौटुंबिक न्यायालयाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ अन्वये घटस्फोटासाठी पतीची याचिका फेटाळण्यात आली होती, या आदेशाला आव्हान देणार्‍या अपीलवर हायकोर्टात सुनावणी सुरू होती.

कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देताना, पतीने दावा केला होता की त्याच्या पत्नीने त्याला सोडले आहे. मात्र उच्च न्यायालयाने मात्र पतीचे क्रूरतेचे आरोप अस्पष्ट आणि सर्वसाधारण स्वरूपाचे असल्याचे म्हटले. तसेच क्रूरतेच्या कोणत्याही विशिष्ट उदाहरणाचा उल्लेख करण्यात आला नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. पतीने फक्त असा दावा केला होता की पत्नीची त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दलची वृत्ती ठिक नव्हती आणि घर सोडण्यापूर्वी ती भांडण करत राहिली.

न्यायलयाने सांगितले की, हिंदू विवाह आणि घटस्फोट (हिमाचल प्रदेश) नियम, १९८२ विशेषत: क्रुरतेचे आरोप हे स्पष्टपणे घटनेची वेळ आणि ठिकाण यासह याचिकेत नमूद केलेले असणे अवश्यक आहे. न्यायालयाने नमूद केले की, केवळ एकच गोष्ट रेकॉर्डवर सिद्ध केली जाऊ शकते की पत्नी १९९५ पासून तिच्या पतीपासून वेगळी राहत होती.

तरीही, न्यायालयाला असे आढळले की तिने घर सोडण्याचा निर्णय चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आणि घर सोडण्या मागची कारणे याचिकेत स्पष्टपणे देण्यात आली नव्हती. त्यानंतर कोर्टाला असे आढळून आले की पत्नीने वेगळे राहण्यासाठी वाजवी कारणे दिली आहेत.

दरम्यान वेगळे राहण्याचा निर्णय योग्य ठरवण्यासाठी पत्नीने कौटुंबिक न्यायालयात सांगितले होते की, तिच्या पतीने दुसरे लग्न केले आहे. तसेच या नात्यातून दोन मुलगेही जन्माला आल्याचा दावा पत्नीने केला आहे.

पतीने या आरोपांना पुरेसा प्रतिसाद दिला नसल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले. पुढे, पत्नीने कौटुंबिक न्यायालयासमोर साक्षीदार हजर केले होते, ज्यांनी तिच्या पतीने दुसरे लग्न केल्याच्या तिच्या आरोपाचे समर्थन केले होते.

या सुनावणीत पत्नीने घर सोडल्याचा पतिचा दावा सिद्ध झाला नाही, असे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे पतीने केलेली घटस्फोटाची याचिका फेटाळली आणि कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT