divorse सकाळ
देश

'पत्नी नाश्ता आणि जेवणात फक्त मॅगीच बनवते..' पतीने दिला घटस्फोट

एका पुरुषाने आपल्या पत्नीला मॅगीशिवाय काहीच स्वयंपाक करता येत नाही म्हणून घटस्फोट मागितला.

सकाळ डिजिटल टीम

मॅगी हे प्रकरण प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मॅगी आवडते. सध्या मॅगीवरून एक प्रकरण प्रचंड गाजतेय. एका पुरुषाने आपल्या पत्नीला मॅगीशिवाय काहीच स्वयंपाक करता येत नाही म्हणून घटस्फोट मागितला. त्याची पत्नी नाश्ता सकाळचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाला मॅगीच बनवते. याला वैतागून या पुरुषाने आपल्या पत्नीस घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.

म्हैसूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एम.एल. रघुनाथ यांनी बल्लारी येथील जिल्हा न्यायाधीश असतानाचा किस्सा सांगितला. क्षुल्लक कारणांवरून जोडप्यांमध्ये घटस्फोट घेण्याच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्याचे ते म्हणाले.

रघुनाथ मॅगी प्रकरणामध्ये बोलताना म्हणाले की या जोडप्याने परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता. सोबतच अलीकडे घटस्फोटात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याबद्दलही त्यांनी सांगितले.

घटस्फोट घेण्यापूर्वी जोडप्यांना किमान एक वर्ष एकत्र राहावे लागते. त्यांनी जोडप्यांनी पुन्हा एकत्र येण्यासाठी किंवा त्यांच्यातील मतभेद सोडवण्यासाठी न्यायालये कशी भूमिका घेतात, याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितले सोबतच हल्ली पती-पत्नी यांच्यातील घटस्फोटामागील कारण शारीरिक समस्या पेक्षा अधिक मानसिक समस्या असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT