Wife molestation in front of husband in Madhya pradesh Wife molestation in front of husband in Madhya pradesh
देश

बोलता-बोलता पत्नीच्या गालाला केला स्पर्श; पतीने विरोध केला असता...

सकाळ डिजिटल टीम

मध्य प्रदेश : एका तरुणाने मित्राच्या पत्नीच्या गालाला स्पर्श (molestation) केला. पतीने विरोध केला असता मित्राने चाकूने हल्ला करून जखमी केले. गंभीर जखमी झाल्यानंतर महिलेच्या पतीचे डोळेही फाटले. ही घटना मध्य प्रदेशातील इंदूरच्या लक्ष्मण पुरा भागात घडली. (Wife molestation in front of husband in Madhya pradesh)

प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मण पुरा भागात राहणाऱ्या लकीची पत्नी दीड महिन्यापासून रागावून माहेरी गेली होती. खूप समजावून सांगितल्यानंतर ती सासरी परतली. पत्नी घरी आल्यानंतर लकी इमारतीच्या खाली तिच्याशी बोलत होता. यावेळी त्यांचे दोन मित्र अजय त्रिपाठी आणि चीना ठाकूर तेथे पोहोचले. बोलत असताना अजयने लकीच्या पत्नीची समजूत काढण्यास सुरुवात केली. तेव्हाच चीना ठाकूरने लकीच्या पत्नीच्या गालावर हात (molestation) ठेवला.

हे लकीला आवडले नाही. याचा लकीने विरोध केला असता मित्रांसोबत वादावादी झाली. यानंतर अजय आणि चीना एकत्र लकीला मारायला लागले. लेकीला जमिनीवर झोपवले आणि गळ्यावर चाकूने वार (Knife attack) केले. एवढेच नाही तर कुलूप मारल्याने त्याचे डोळे फुटले.

चीनावर चोरी, मारहाणीचे अनेक गुन्हे

चीना ठाकूरवर चोरी, मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. चीना काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता. याप्रकरणी अजय आणि चीना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Kolhapur Wildlife News : गगनबावड्यात आढळला साडेपाच फूट लांबीचा अजगर; ग्रामस्थांची उडाली भंबेरी, वन विभागाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा धोका

Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाकडून आईला बेदम मारहाण; उपचारांपूर्वीच मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना यवत पोलिसांची नोटीस; आक्रोश मोर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना

Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलयाचा धोका! भोटेकोसी नदी फुगली; ७८८ मृत्यू, तीन हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता

SCROLL FOR NEXT