Delhi Woman Raped e sakal
देश

आधी केस कापले, मग धिंड...प्रजासत्ताकदिनीच महिलेवर सामूहिक बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशाला हादरवणारी घटना घडली. एका विवाहीत महिलेचे अपहरण करण्यात आले. तिच्यावर सामूहिक बलात्कार (Delhi Woman Raped) करून तिचे केस कापण्यात आले. इतकेच नाहीतर तिला चपलांचा हार घालून रस्त्यावर फिरायला लावले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) चार आरोपींना अटक केली आहे.

पीडित महिलेचे लग्न झाले असून तिला एक अपत्य आहे. तिचे आणि एका तरुणाचे प्रेमसंबंध होते, अशी माहिती आहे. मात्र, तो तरुण नोव्हेंबर महिन्यात आत्महत्या करून मरण पावला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी या महिलेला आत्महत्येसाठी जबाबदार धरले. तसेच तिला शिवीगाळ केली. पण, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या महिलेचे अपहरण करण्यात आले. त्यानतंर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतकेच नाहीतर तिचे केस देखील कापले आणि तिला चपलांचा हार घालून आरोपींनी रस्त्यावर फिरायला लावले.

आरोपींसोबत महिलेचे वैयक्तिक वाद होते. त्यामुळे वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वैयक्तिक वैमनस्यातून एका महिलेवर लैंगिक अत्याचाराची दुर्दैवी घटना शाहदरा जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे आणि चौकशी सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं. तसेच महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्काराचा एफआयआरही दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी, पेपरफुटी प्रकरणानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडवर

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

बांगलादेशात मोठा राजकीय उलटफेर! राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; कार्यकाळ २०२८ पर्यंत असतानाही का पद सोडले?

BSF Martyr Suresh Ambadkar: भारत-बांगलादेश सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना कुरखेड्याचा बीएसएफ जवान सुरेश आंबडर हुतात्मा

Pune Metro Safety Nod: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला सुरक्षा मंजुरी; ‘माण–बालेवाडी’ टप्पा सुरू करण्याचा निर्णय आता सरकारच्या कोर्टात

SCROLL FOR NEXT