woman officer commits suicide in arunachal pradesh due to fear of corona virus 
देश

धक्कादायक ! कोरोना झाल्याच्या भितीने महिला अधिकाऱ्याची आत्महत्या

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना झाल्याच्या भितीतून एका महिला अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अरुणाचल प्रदेश येथे महिला अधिकाऱ्याने शुक्रवारी (ता.०३) आपल्या राहत्या घरीच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कामाचा ताण सहन न झाल्याने या महिला अधिकारी त्रस्त होत्या, तसेच कोरोना-कोविड १९ रोगाची भीतीही होती. त्यामुळे या महिला अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पापुम पारे येथे आपत्ती निवारण अधिकारी शेरिंग युंगजोम (३८) या महिला अधिकाऱ्यांनी जिल्हा उपायुक्त यांना उद्देशून आपले राजीनामा पत्र लिहून बाथरुममध्ये स्वत:ला फाशी लावून घेतली. त्यांच्या रुममधील एका टेबलवर हे पत्र मिळाल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे. संबंधित अधिकारी महिलेल्या कुटुंबीयांनी मानसिक आणि शारिरीक त्रास सहन न झाल्याने आणि कोरोनाग्रस्त असल्याची भीती वाटल्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे.

Coronavirus : पंतप्रधान मोदी साधणार विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संवाद

दरम्यानन, देशातील इतर राज्यांतूनही अशी प्रकरणे समोर येत आहेत. कोरोना संसर्गाच्या भीतीने काही जणांकडून आत्महत्यासारखे पाऊल उचलण्याचे प्रयत्न होत आहेत. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशच्या सहानपूर येथील एका व्यक्तीने कोरोना संक्रमणाच्या भीतीने आत्महत्या केली होती. तत्पूर्वी, जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचा कहर भारतातही पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून ३५०० वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील जवळपास १०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका हा २१ ते ४० वर्षे वयोगटातील लोकांना असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT