BJP sakal media
देश

भाजपला मतदान केल्याने पतीचा संताप, पत्नीला मागितला घटस्फोट

भाजपला मतदान केल्यामुळे घटस्फोटाची धमकी

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) एका मुस्लिम महिलेने पतीवर आरोप लावला की भारतीय जनता पक्षाला मतदान केल्यामुळे तिला घटस्फोटाची धमकी दिली जात आहे. बरेलीतील रहिवासी उजमा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सदरील आरोप केले. पती आणि चुलत सासऱ्याने त्यांना समाजवादी पक्षाला मतदान करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी भाजपला (BJP) मतदान केले. उजमा म्हणाल्या, की मोफत अन्नधान्य आणि तीन तलाकवर बंदी घातल्याने त्यांनी भाजपला मतदान केले. त्या म्हणाल्या, घरी पतीचे चुलते आले होते. त्यांनी हसता-हसता सांगितले की मतदान सायकलला द्यायचे. मी हसायला लागले. (Woman Voted For BJP, Husband Demand Divorce From Her In Uttar Pradesh)

मी म्हटले ठिक आहे. मी योगीजींना (Yogi) मतदान केले आहे, असे त्या महिलेने सांगितले. मला विचारले गेले की का योगीजींना मतदान केले. मी म्हणाले, की चुकीचे काय झाले. धान्य दोनदा मिळत आहे. तेल ही मिळत आहे. सर्व वस्तू मिळत आहेत. तीन तलाक बंद झाले आहे, असं म्हणताच मला तीन तलाक तू आता थांबवूनच दाखवं, अशी धमकी महिलेला देण्यात आली. पती म्हणाला, तू येथून जा आणि तलाक थांबवून दाखवं. पोलिसांकडे तक्रार दाखल केली का? असा प्रश्न विचारताच उजमा म्हणाल्या, तक्रार दाखल केलेली नाही. कारण ते श्रीमंत लोक आहेत.

मी गरीब आहे. माझे वडील मजूरी करतात. माझी एवढी पात्रता नाही की मी पोलिसांकडे जाऊ शकेल. मी खूप घाबरली असून येथे भीत-भीत आले. बरेलीच्या पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिस म्हणाले, की घरगुती वादामुळे उजमा आणि त्यांचे पती वेगवेगळे राहत होते. या प्रकरणी चौकशी सुरु असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT