love
love 
देश

खिडकी उघडी ठेवून नवविवाहित जोडप्याचं सेक्स; शेजारी महिलेची पोलिसात तक्रार, पण पुढे वेगळंच घडलं

कार्तिक पुजारी

बेंगळुरु- १९८६ साली आलेला पडोसन चित्रपट आणि त्यामधील सुप्रसिद्ध 'मेरे सामने वाली खिडकी मैं' हे गाणं आपल्या परिचयाचं असेल. चित्रपट दोन शेजाऱ्यांच्यामधील प्रेम दाखवणारा आहे, खिडकीच्या माध्यमातून शेजारी एकमेकांच्या आयुष्यात डोकावत असतात. पण, खऱ्या आयुष्यामध्ये एकमेकांच्या खिडकीमध्ये डोकावणं किंवा काही पाहणं त्रासदायक ठरु शकतं. बेंगळुरुमध्ये असाच एक प्रकार समोर आलाय. ( couple having inappropriate act while keeping the window open)

दक्षिण बेंगळुरुच्या गिरिनगरच्या अवलाहल्ली येथे राहणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेने आपल्या शेजाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोमरच्या खिडकीत पाहिल्यानंतर जोडपे सेक्स करताना दिसतात, असं म्हणत महिलेने ही तक्रार दाखल केली आहे. महिलेने आपल्या तक्रारीमध्ये म्हणलंय की, शेजारी खिडकीचा दरवाजा उघडा ठेवून लैंगिक संबंध ठेवतात. ( women in Bengaluru police complaint against neighbour couple )

प्रकरणात आहे ट्विस्ट

प्रकरण वाटतंय तितकं सरळ नाही. नवविवाहीत जोडपे ज्या ठिकाणी राहते त्या घराच्या मालकाच्या पत्नीने देखील विरोधात तक्रार दाखल केली आहे. घरमालकाच्या पत्नीने आरोप केलाय की, शेजारी महिलेच्या कुटुंबियांनी भाडेकरुंनी घर सोडून जावं यासाठी प्रयत्न चालवला आहे. त्यामुळेच महिला असे आरोप करत आहे. दोन्ही गटाकडून तक्रार दाखल झाल्यानंतर दोन्ही पक्ष पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. त्यांनी प्रकरण पुढे न नेण्याचा निर्णय घेतलाय. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

पोलिसांनी दोन्ही बाजूंकडून तक्रार दाखल करुन घेतली होती. त्यामुळे तक्रारदारांना सांगितलंय की, त्यांना आता कोर्टामध्ये जावं लागेल. ८ मार्च रोजी गृहिणी महिलेने प्राथमिक तक्रार केली होती. तक्रारीत ती म्हणाली होती, की रात्री साडेदहा वाजता जेव्हा तिने दरवाजा उघडला, तेव्हा तिला धक्का बसला. नवविवाहित जोडपे सेक्स करत होते. हे खूप किळलवाणं होतं. मी त्यांना म्हटलं की, तुम्ही खिडकी लावून घ्या आणि जे करायचंय ते करा. पण, त्यांनी माझं ऐकलं नाही, उलट मलाच त्यांनी शिव्या दिल्या, बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल, पुढे काय?

नवविवाहित जोडप्याच्या घरमालकाने १० मार्च रोजी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये घरमालकांनी शेजारी महिलेने भाडेकरुंसोबत मुद्दामहून भांडण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नवविहाहित जोडपे, घरमालक आणि शेजारी महिला आणि तिचा पती या सगळ्यांविरोधात आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT