inspiration story, covid 19, women provide food to covid 19 patients family 
देश

स्वत:वरील संकटाने दिली प्रेरणा; कोरोनाबाधितांच्या कुटुंबासाठी बनली 'अन्नपूर्णा'

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला असून सर्वांचे लक्ष लस कधी येणार याकडे लागलं आहे. दरम्यान, कोरोनाची सुरुवातीला जितकी भीती लोकांच्या मनात होती तितकी राहिली नसल्याचं दिसतं. कोरोनाच्या संकटकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन लोकांना करण्यात आलं होतं. मात्र अनेकदा कोरोना झालेल्या लोकांना वाईट वागणूक दिल्याचे प्रकारही समोर आले होते. तर काही ठिकाणी माणुसकीची उदाहरणंही बघायला मिळाली आहेत.

आताही अशाच एका महिलांच्या टीमने कोरोना बाधित आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठं काम केलं आहे. 10 महिलांची एक टीम अशा लोकांना अन्न पुरवण्याचं काम करते ज्यांच्या कुटुंबात कोणी कोरोनाबाधित आहे किंवा कोरोनाशी लढत आहेत. 

अन्न पुरवण्याचं काम करण्याची प्रेरणा स्वत:ला आलेल्या अडचणीतून मिळाली असं या टीममधील निशा चोप्रा यांनी म्हटलं. कोरोना झाला असताना त्यांच्या कुटुंबाला खाण्या-पिण्याचे हाल सहन करावे लागले. तेव्हा त्यांच्या मनात आलं की, सध्याच्या परिस्थिती आपल्यासारखेच आणखी किती लोक असतील ज्यांच्या कुटुंबात एखाद्याला कोरोना झाला आहे. त्यांच्या घरची परिस्थितीही कठीण आहे. जेव्हा आपल्या कुटुंबाती मुलांची अवस्था त्यांनी पाहिली तेव्हाच अशा अडचणीचा सामना करणाऱ्या लोकांची मदत करण्याचं त्यांनी ठरवलं. 

सुरुवातील निशा चोप्रा या त्यांच्या जवळपास असलेल्या कोरोनाशी लढा देणाऱ्या कुटुंबाना मदत करत होत्या. मात्र त्यांनी आता हे काम मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात केली आहे. सध्या दहा महिलांची एक टीम तयार करण्यात आली असून यामध्ये जेवण तयार करणाऱ्या महिलासुद्धा आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दहा महिलांची ही टीम आता दररोज जवळपास शंभर घरी जेवण पोहोचवते. कोरोनाबाधित कुटुंब राहत असलेल्या घराच्या दारात जेवण पोहोचवलं जातं. यातून टीम एवढाच संदेश देते की लोकांची मदत करा. याशिवाय लोकांना त्यांच्या जवळपास कोणाला मदतीची गरज असल्यास कळवा असंही त्यांनी तिथल्या परिसरात सांगितलं आहे. 

निशा यांना आता दररोज अनेक फोन्स येतात. काही लोक त्यांच्याकडे स्वयंसेवक म्हणून काम करतात. दरम्यान, यातील काही लोक आजारी पडले. त्यांच्या यादीत अनेक घरं अशी आहेत ज्या ठिकाणी मुलं किंवा वृद्ध राहतात. दक्षिण दिल्लीमध्ये राहणाऱ्या निशा एक स्वयंसेवी संस्थासुद्धा चालवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT