Women-Safety
Women-Safety 
देश

#WomenSafety मानवतेला काळिमा फासणारे ८० लाख ‘सर्च’

सकाळ वृत्तसेवा

पुणे - हैदराबादमधील तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आले. ही घटनाच माणुसकीला काळिमा फासणारी असतानाच देशात त्याहूनही घृणास्पद गोष्ट घडली आहे. एका पॉर्न साइटवर तिचे नाव पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत होते. यातून समाजातील विकृती लक्षात येते. समाजातील ही वृत्ती चीड आणणारी आहे.

जगातील सर्वांत जास्त पाहिल्या जाणाऱ्या पॉर्न साइट्‌सपैकी असणाऱ्या या साइटच्या भारत आणि पाकिस्तान व्हर्जनमध्ये तब्बल ८० लाख लोकांनी या तरुणीचा व्हिडिओ सर्च केला. रविवार संध्याकाळपर्यंत तिचे नाव या साइटवर ट्रेंड करीत होते. यामध्ये सर्वाधिक सर्च पश्‍चिम बंगाल आणि त्यापाठोपाठ तेलंगण राज्यातून केले गेले.

तिच्या नावाचा टॅग या पॉर्न साइटवरून काढून टाकण्यात यावा, यासाठी change.org वर एक ऑनलाइन मोहीम सुरू करण्यात आली आहे. या साइटवर जाऊन तुम्हीसुद्धा ‘ऑनलाइन पिटीशन साइन’ करून या मोहिमेत सहभागी होऊ शकता.

ज्यांना दुसऱ्या व्यक्तीवर अधिकार गाजवायचा असतो अशाच व्यक्तींकडून बलात्कार होतो. बलात्काराचा व्हिडिओ सर्च करणारेही अशाच विकृत मानसिकतेचे असतात. दुसऱ्यांनी केलेल्या विकृत गोष्टींमधून ते आनंद मिळवतात. ते बहुतांश वेळी एकटे असतात, त्यांना नाती टिकवता येत नाहीत. 
- डॉ. सागर पाठक, स्त्रीरोगतज्ज्ञ व लैंगिक समुपदेशक

अशा प्रकारच्या विकृतीला ‘मिसिंग टाइल्स’ फिलॉसॉफी म्हणतात. अशा लोकांना चांगली गोष्ट दिसत नाही; परंतु वाईट गोष्ट पटकन दिसते. असे व्हिडिओ सर्च करण्यामागेही हीच कारणे आहेत. परिणामांचा विचार न करता जी गोष्ट केली जाते, त्यातून ही विकृती जन्म घेते. अशा लोकांसाठी समुपदेशनाची गरज आहे. 
- स्मिता जोशी, मानसोपचारतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT