World Art Day 2022 sakal
देश

World Art Day: आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेच्या दिवसाचे महत्व जाणून घ्या

स्वतःमध्ये असलेल्या सुप्त गुणांमुळे कला निर्माण होते

दिपाली सुसर

कला म्हणजे काय तर विविध घटकांची अनुभूती देणारी रेखीव मांडणी. आज 15 एप्रिल जागतिक कला दिवस आहे. जगातील अनेक लोक असे आहेत की ज्यांना कोणत्या ना कोणत्या कलेमध्ये रूची असते आणि त्याचं त्यांना प्रदर्शन करावं लागतंय. या खास दिवसाच्या निमित्ताने ते एकमेकांना जागरूकही करतात. लोकांमध्ये असणाऱ्या विविध कलांना वाव देणं, त्याला प्रोत्साहन देणं, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. (world art day is marked to promote the development, diffusion and enjoyment of art)

कला दिवसाच्या या उत्सवामध्ये जगाच्या विविध संस्कृतींमधून सामायिक होण्याची आणि शिकण्याची मोठी क्षमता आहे आणि या माध्यमातून विविध भागांतील दिग्गजांना भेटून त्यांच्या कलात्मक कौशल्यांना प्रोत्साहन दिले जाते.

कला सृजनात्मकतेचे पोषण करते, ग्रहावरील प्रत्येक मानवासाठी नाविन्य आणि सांस्कृतिक विविधता इंधन देते आणि ज्ञानातील देवाणघेवाण आणि समाजातील प्रोत्साहनात्मक संवादामध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. खरं तर असे वातावरण तयार करण्याची आवश्यकता आहे, जिथे कलाकार आणि कलात्मक स्वातंत्र्य समर्थित आणि संरक्षित असेल.

लिओ नार्डो दा व्हिन्सी (Leonardo Da Vinci) यांची जयंतीचे औचित्य साधुन हा दिवस पहिल्यांदा 15 एप्रिल रोजी 2012 मध्ये साजरा करण्यात आला होता. मग या दिवसाचा अधिकृत उत्सव 2015 USA मध्ये अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये झाला, तर 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय असोसिएशन ऑफ आर्टने आपला पहिला अमेरिकन अध्याय तयार केला आणि मग हळुहळु आपल्या भारतातही कला दिवस साजरा होऊ लागला.

खरं तर कला आयुष्याला समृद्ध करते. कला आयुष्यात रंग भरते. कला हि विविध गोष्टीतून आपणास दिसून येत असते. हि कला जोपासण्याचे व तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काम हे आपणा सर्व मानव जातीस करावे अश्या या कलेचे कोणकोणते उपयोग आपणास होतात व त्यामुळे मानवी संस्कृती कशीअबाधित राहते, यातून आपणास दिसून येते.

१. एखाद्या कलाकारास त्याचे विचार जगासमोर आणायचे असतील तर कलेच्या विविध माध्यमातून तो आणता येतो.

२. चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला अश्या माध्यमातून रेखाटलेली कला वा मांडलेला अविष्कार हा पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येते

एखादी कला अवगत असल्याने त्या कलाकाराला लोकप्रियता मिळते. स्वतःमध्ये असलेल्या सुप्त गुणांमुळे कला निर्माण होते. कला ही विविध पर्यायांच्या रुपात दिसून येते.

कलेचे तीन महत्त्वाचे उपयोग

१)सगळं संपेल पण कलाच साथ देईल

२) कलाकाराचा एक क्षण म्हणजे ब्रम्हदेवाची हजार युगे

३)कला माणसं जोडते

चित्रकार तेजस्विनी निकम बंगाळे या कला दिनाचा शुभेच्छा देतांना सांगतात की माणसाने आपल्या जीवनामध्ये एक तरी कला जोपासायला हवी कारण काय तर विरंगुळा आणि त्याहीपेक्षा आपल्या अंतर्मनातील स्वत्वाचा शोध घेण्याचे उत्तम साधन म्हणजे कला होय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT