World Music Day  esakal
देश

World Music Day : म्युझिकमध्ये आहे जादू! तानसेनने सम्राट अकबरासाठी केली होती या रागाची निर्मिती

गाणी ऐकण्यामागचे प्रत्येकाचे कारण वेगवेगळे असू शकते

साक्षी राऊत

World Music Day : म्युझिक निसर्गाच्या कणाकणांत आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र हल्ली धकाधकीच्या आयुष्यात तुम्हाला चौफेर गोंधळ आणि ट्रॅफिकचा आवाजच ऐकू येईल. अशावेळी थकलेली लोकं त्यांची चिडचिड कमी व्हावी म्हणून मूड स्विंगसाठी गाणी ऐकतात.

गाणी ऐकण्यामागचे प्रत्येकाचे कारण वेगवेगळे असू शकते. कोणी गाणी ऐकतं मनोरंजनासाठी तर कोणी गाणी ऐकतं ते त्यांच्या विरंगूळा व्हावा म्हणून तर कोणी गाणं ऐकतं ते त्यांचं दु:ख विसरण्यासाठी किंवा एखाद्याच्या आठवणीत.

मात्र मनोरंजनाव्यतिरिक्त म्युझिक ऐकण्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत. अनेकांना याबाबत मात्र माहिती नाही. संगीतामध्ये जादू आहे. एखादी चिंता, थकवा, काळजी दूर करण्यासाठी म्युझिक ही प्रभावी थेरपी आहे. संगीत ऐकल्यामुळे उजव्या आणि डाव्या मेंदूमधील सुसूत्रीकरण करण्यासाठी उपयोग होतो. याचा उपयोग शरीरातील थकवा, चिंता दूर होण्यासाठी होतो. अशा कारणांसाठी म्युजिक थेरपी सध्या फार प्रचलित आहे.

अशी आख्यायिका आहे, की तानसेनने दरबारामध्ये राजा अकबरासाठी ‘रागदरबारी’ या रागाची निर्मिती केली होती. संगीतामधल्या या  रागामुळे राजा अकबराच्या मनावरचा ताण, थकवा दूर करण्यासाठी मदत होत असे. भारतीय संगीतशास्त्रामध्ये विविध राग आणि त्यांचा शरीरावर होणारा परिणाम याची सांगड घालण्यात आली आहे. (Music Day)

World Music Day

म्युझिकची जादू तुम्हालाही अनुभवायची असेल तर तुम्हीही हे उपाय करून बघा

सकाळी उठल्यावर तुमच्या आवडीचं गाणं टीव्हीवर, रेडिओवर किंवा मोबाईलवर ऐका. शिवाय दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही जी धून ऐकता ती दिवसभर तुमच्या डोक्यात असते. त्यामुळे तुमच्या एखाद्या आवडीच्या गाण्याने दिवसाची सुरुवात करा. जेव्हा तुम्हाला अतिराग येत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तेव्हा गाणी नक्की ऐका त्याने तुमचा मूड रिफ्रेश होईल.

एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याच्या खोलीत गाणी ऐकता येईल अशी व्यवस्था करा.जेणेकरून आजारी माणसाला त्यांच्या आजापणाच्या विचारांपासून दूर ठेवता येईल. गर्भवती महिलेने संगीत ऐकणे फार फायद्याचे असते. संगीत ऐकल्याने गर्भावर चांगले संस्कार होतात. या काळामध्ये बाळावर गर्भ संस्कार होतात, तेव्हा अशा वेळी चांगले संगीत ऐकण्यासाठी होणाऱ्या आईला नक्की सुचवा. (Lifestyle)

तुमच्या मूडनुसार संगीताचे हे प्रकार ऐका

रागभूपाळी/ रागतोडी - उच्च रक्तदाबाच्या समस्या असणाऱ्या लोकांनी हे संगीत नक्की ऐका.

राग चंद्रकंस - हृदयविकाराची समस्या असेल तर हे म्युझिक ऐका.

राग तिलककामोद दुर्गा, कलावती - ताणतणाव कमी करण्यासाठी हे म्युझिक ऐका.

राग बिहार आणि राग बहार - शांत झोपेसाठी हे म्युझिक ऐका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

voting without voter ID : मतदार ओळखपत्र नसले तरीही करता येणार मतदान, जाणून घ्या कसं?

Big Blow: भारताच्या स्टार खेळाडूची IND vs NZ ट्वेंटी-२० मालिकेतूनही माघार; वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह

Iran Calls India : अमेरिकेकडून हल्ला होण्याची भीती असताना, इराणने भारताला केला फोन अन्...

MCA: मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय! रोहित - रहाणेसह IPL खेळणाऱ्या खेळाडूंना देणार नाही करार; कारण घ्या जाणून

Visa Suspend: अमेरिकेचा मोठा निर्णय! रशिया, इराणसह ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली; भारत आणि पाकिस्तानचं काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT