ANI
देश

छोटीशी ठिणगी भारत-चीन युद्धाला पुरेशी होती, लडाख सीमावाद

हवेत गोळ्यांच्या फैरीही झाडल्या आल्या.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: भारत आणि चीनमध्ये सुरु झालेल्या लडाख सीमावादाला (ladakh stand off) आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालं. याच दिवशी पँगाँग टीएसओ (pangog tso sector) सेक्टरच्या फिंगर फोर भागात भारतीय आणि चिनी सैनिक परस्परांना (India-China clash) भिडले होते. १९६२ सालच्या युद्धानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये अशा प्रकारचा मोठा तणाव निर्माण झाला होता. भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूला अनेकजण गंभीर जखमी झाले. (Year after first big India-China clash in Ladakh)

आज वर्षभरानंतर नियंत्रण रेषेवर स्थिती शांत आहे. पण दोन्ही देशांमध्ये विश्वासाचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. गलवान खोरं आणि पँगाँग टीएसओ फिंगर फोरच्या भागात संघर्ष टीपेला पोहोचला होता. पँगाँग टीएसओमध्ये तर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले होते. हवेत गोळ्यांच्या फैरीही झाडल्या आल्या. दोन्ही देशांचे रणगाडे परस्परांच्या रेंजमध्ये होते. छोटीशी ठिणगी सुद्धा युद्धाला पुरेशी ठरली असती.

१५ जूनला गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर परिस्थिती अत्यंत चिघळली होती. भारताचे २० जवान शहीद झाले होते तर चीनच्या बाजूला ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. पण हळूहळ लष्करी आणि राजनैतिक स्तरावरील अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर परिस्थिती निवळली. आता पँगाँग टीएसओ आणि गलवान खोऱ्यातून दोन्ही देशांच्या सैनिकांनी माघार घेतली आहे.

पण डेसपांग प्लेन्स, हॉट स्प्रिंग, गोग्रा आणि डेमचॉकमध्ये अजूनही संघर्षाची स्थिती आहे. इथे पूर्वीसारख तणाव नाहीय. पण अजूनही या भागातून चिनी सैन्य मागे हटलेले नाही. पँगाँग टीएसओमधून चिनी सैन्य मागे हटले आहे पण LAC पासून ७० किमी अंतरावरील रुताँगमध्ये चीनने सैन्याची तैनाती करुन ठेवली आहे. लडाखमध्ये आता मागच्यावर्षी होती, तशी तणावाची स्थिती नाहीय. पण अजूनही सीमावाद पूर्णपणे मिटलेला नाही. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार अजून काही महिने सीमावादाचा प्रश्न कायम राहू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways : पुणे, मुंबई, कोल्हापूरहून धावणाऱ्या 8 एक्स्प्रेस गाड्यांना जानेवारी 2026 पासून मिळणार 'LHB' डबे

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Mumbai Crime: मध्यरात्री फिरताना २७ वर्षीय फ्रेंच तरुणीसोबत तरूणानं नको ते कृत्य केलं अन्...; मुंबईत नेमकं काय घडलं?

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

SCROLL FOR NEXT