yogi adityanath 
देश

बळजबरीचे धर्मांतर केल्यास तुरुंगाची हवा; उ. प्रदेशात कायदा

पी. बी. सिंह

लखनौ - राज्यात बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराला रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने अध्यादेश आणला असून त्यास आज उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. याप्रमाणे धर्मांतर प्रतिबंध कायदा राज्यात लागू झाला असून कायदा मोडणाऱ्यास किमान एक वर्ष ते दहा वर्षाची कैद आणि दंडही भरावा लागणार आहे. याशिवाय विवाहासाठी केलेले धर्मांतर केल्यास तो विवाह कायद्याने अमान्य ठरणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

धर्म लपवून किंवा जबरदस्तीने धर्मांतर करून होणाऱ्या विवाहांना रोखण्यासाठी योगी सरकारने धर्मांतर बंदी अध्यादेशाच्या मसुद्यास मंजुरी दिली आहे. खोटे-नाटे बोलून फसवणूक करत धर्मांतर करणाऱ्या लोकांना योगी सरकारकडून कडक कारवाई केली जाणार आहे. राज्यपालांची मंजुरी मिळताच कायदा लागू होणार असून हा गुन्हा अजामीनपात्र आहे.

या अध्यादेशातील प्रमुख तरतुदींमध्ये, कायदा मोडल्यास दहा वर्षांपर्यंत कैद भोगावी लागेल, धर्मांतर हे स्वच्छेने असल्याचे सिद्ध करावे लागेल, धर्मांतराची सूचना दोन महिने अगोदर जिल्हा दंडाधिकाऱ्यास द्यावी लागेल, यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशात एस्मा लागू
उत्तर प्रदेशात एस्मा कायदा लागू केला असून यानुसार सरकारी विभाग, सरकारच्या नियंत्रणाखाली असलेले महामंडळ आणि प्राधिकरणातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या उपोषणावर आणि संपावर बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्‍यक सेवा कायद्यातर्गंत या विभागाचा समावेश केला असून त्यानुसार एस्मा लागू केला आहे. यानंतर कर्मचारी आता २५ मे पर्यंत संपावर जाऊ शकणार नाहीत. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने एस्मा  लागू केल्याचे बोलले जात आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

BABAR AZAM: शतक झालं नाही, तरी बाबर आझमने इतिहास रचला! ७६ धावांच्या खेळीने विराट-पाँटिंगच्या खास क्लबमध्ये एन्ट्री, नेमका कोणता विक्रम?

“मी जीवन संपवतोय…” ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट; पोलिसांची धावाधाव

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

CM Devendra Fadnavis : एमपीएससी परीक्षेतील गैरप्रकाराबाबत सरकार कठोर; राजकीय पोळी भाजू देणार नाही; सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी

SCROLL FOR NEXT