Crime News Esakal
देश

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

Social media Crime News: एका 20 वर्षीय तरुणाची इंस्टाग्रामवर एका मध्यमवयीन महिलेशी मैत्री झाली. महिलेने तिच्या प्रोफाईलमध्ये एका तरुणीचा फोटो लावला होता. अशा स्थितीत तो जेव्हा महिलेला भेटायला पोहोचला तेव्हा तिचा चेहरा पाहताच तो संतापला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Crime News: सोशल मिडीया वापरत असताना अनेकदा काहीजण आपला प्रोफाइलला आपला फोटो न लावता एखाद्या अभिनेत्रीचा किंवा दुसऱ्या एखाद्या तरूणीचा फोटो लावतात. पण कधीकधी हे घातक देखील ठरू शकतं. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका मध्यमवयीन महिलेने एका तरूणीचा फोटो सोशल मिडीयावर प्रोफाइल म्हणून लावला त्यानंतर तिची एका तरूणाशी मैत्री झाली, ते दोघे भेटले जेव्हा फोटो आणि वास्तव वेगळे दिसून आले तेव्हा संतापलेल्या तरूणाने महिलेला मारहाण करत तिचा फोन घेऊन तो पसार झाला.

यूपीच्या कानपूरमध्ये एका 20 वर्षीय तरुणाची इंस्टाग्रामवर एका मध्यमवयीन महिलेशी मैत्री झाली, त्यानंतर ते दोघे भेटले आणि पहिल्या भेटीतच त्याने महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने तिच्या प्रोफाईलमध्ये एका तरुणीचा फोटो लावला होता. तोच फोटो पाहून तरुणाची फसगत झाली. अशा स्थितीत तो महिलेला भेटायला पोहोचला तेव्हा तिचा चेहरा पाहताच तो संतापला. यावरून तरुणाचा महिलेशी वाद झाला. यानंतर तरुणाने महिलेला बेदम मारहाण केली आणि तिचा मोबाईल घेऊन पळ काढला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेतले आहे.

कानपूरच्या सचेंडी पोलीस स्टेशन परिसरातील एका ४५ वर्षीय महिलेला इंस्टाग्रामवर दुसऱ्या एका तरूण मुलीचा फोटो पोस्ट करून २० वर्षीय तरूणाशी बोलणं महागात पडलं आहे. सोशल मिडीयावरून बोलत असताना महिलेचे तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यामुळे हा तरुण महिलेला भेटण्यासाठी गेला. पण पहिल्या भेटीतच तरुणाने त्या महिलेशी इंस्टाग्रामवर सुंदर दिसणे आणि प्रत्यक्षात सुंदर नसणे यावर वाद घातला.

यावेळी दोघांमध्ये वाद आणि हाणामारी झाली. मारामारी दरम्यान दीपेंद्र सिंग नावाच्या तरुणाने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. दीपेंद्रने महिलेचं डोकं फोडल्याचा आरोप आहे. त्याला जमिनीवर खाली पाडून जखमी केलं. इतकंच नाही तर महिलेसोबत चॅटिंग करत असलेला मोबाईल घेऊन तो घटनास्थळावरून पळून गेला.

महिलेने आणखी एक किस्सा पोलिसांना सांगितला

आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेनंतर पीडित महिलेने तरुणासोबत चॅटिंगची बाब लपवून ठेवत पोलिसांत मोबाइल चोरीची तक्रार दाखल केली. अज्ञात तरुणाने मोबाईल लुटून मारहाण केल्याची तक्रार तिने दिली. मात्र सचेंडी पोलिसांनी तपास केला असता ही बाब उघडकीस आली.

एसीपी टीव्ही सिंग यांनी सांगितले की, तक्रारदार महिलेची दीपेंद्र सिंग नावाच्या तरुणाशी मैत्री होती. तो तिला भेटायला तिच्या घरी आला. यादरम्यान त्याच्याशी हाणामारी झाली. दीपेंद्रच्या मारहाणीमुळे महिलेच्या डोक्याला दुखापत झाली. महिलेला जखमी केल्यानंतर तो पळून गेला. या प्रकरणी महिलेने मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली होती, मात्र त्याची चौकशी करून पुरावे गोळा करत असताना संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे. सध्या दीपेंद्र सिंग याला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT