young lady was killed after the unsuccessfully falling in love at uttar pradesh 
देश

तुझ्यावर खूप प्रेम करतोय; हो बोल म्हणाला अन्....

वृत्तसंस्था

प्रयागराज (उत्तर प्रदेश): एकतर्फी प्रेमातून एका युवकाने युवतीला भेटायला बोलावले आणि अज्ञात ठिकाणी घेऊन गेला. तिने प्रेमास नकार दिल्यानंतर त्याने गळा दाबून खून केला. याप्रकरणी युवकाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीपल गावामध्ये ही घटना घडली आहे. गावामध्ये राहाणारा प्रीतम यादव हा हेमावर एकतर्फी प्रेम करत होता. हेमा एका मॉलमध्ये तर प्रीतम हा शाळेची मोटार चालवण्याचे काम करत होता. प्रीतम हा हेमाला त्रास देत होता. याबद्दल त्याला अनेकदा समाजवून सांगण्यात आले होते. पंरतु, तो ऐकत नव्हता. हेमाचा विवाह ठरल्याची माहिती त्याला मिळाली होती. प्रीतमने हेमाला फोन करून तुझ्याशी शेवटचे बोलायचे आहे, असे म्हणून बोलावले. हेमाला दुचाकीवर बसवून अज्ञात ठिकाणी घेऊन गेला. दिवसभर त्याने हेमाला थांबवून ठेवले. तिने प्रेमाला नकार दिल्यानंतर त्याने गळा दाबून खून केला व मृतदेह रेल्वे रुळावर टाकून दिला होता.

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर प्रीतमची माहिती पुढे आली. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने खूनाची कबुली दिली. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT