Agniveer Exam Indian Army esakal
देश

Agniveer : 'भावा, मी नाही सैनिक बनू शकलो, पण तू नक्की हो'; अग्निवीर परीक्षेत नापास झाल्याने तरुणाची आत्महत्या

नुकतीच दीपूनं सैन्य भरतीची परीक्षा दिली होती. 30 जानेवारीला परीक्षेचा निकाल लागला, त्यात तो नापास झाला.

सकाळ डिजिटल टीम

मी चार वर्षे खूप मेहनत केली, पण काहीही साध्य झालं नाही.'

नोएडातील (Noida) बरौली गावात राहून अग्निवीर परीक्षेची (Agniveer Exam) तयारी करणाऱ्या तरुणानं परीक्षेत नापास झाल्यामुळं गळफास लावून आत्महत्या केलीये.

पोलिसांना मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट मिळाली असून त्यात त्यानं लिहिलंय, 'माझं स्वप्न भंगलंय. मी सैनिक बनू शकलो नाही, पण तू नक्की सैनिक हो आणि आई-वडिलांची काळजी घे.' याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

पोलिसांनी सांगितलं की, मृत 19 वर्षीय दीपू हा अलिगढचा रहिवासी आहे. त्याच्या मृतदेहाजवळ तीन पानी सुसाईड नोट सापडली असून त्यात त्यानं लिहिलंय, 'मी चार वर्षे खूप मेहनत केली, पण काहीही साध्य झालं नाही. मला माझ्या आई-वडिलांचं नाव रोशन करायचं होतं. या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी मी नक्कीच सैनिक होईन. या सुसाईड नोटमध्ये दीपूनं आपल्या भावाला लिहिलंय, माझं स्वप्न भंगलंय. मी सैनिक बनू शकलो नाही, पण तू नक्की सैनिक हो आणि आई-वडिलांची काळजी घे.'

नुकतीच दीपूनं सैन्य भरतीची परीक्षा दिली होती. 30 जानेवारीला परीक्षेचा निकाल लागला, त्यात तो नापास झाला. त्यामुळं त्यानं हे टोकचं पाऊल उचललं. नोएडा झोनचे अतिरिक्त डीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी सांगितलं की, अलिगढचा रहिवासी असलेला 19 वर्षीय दीपू लहान भाऊ अमन आणि मावशीचा मुलगा अंशूसोबत बरौलाला राहत होता. दीपू आणि त्याचा भाऊ नोएडामध्ये राहून सैन्यात भरतीची तयारी करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT