Young weather champion Prajakta Koli Young weather champion Prajakta Koli
देश

Young weather champion : प्राजक्ता कोळी साधणार तरुणांशी संवाद

सकाळ डिजिटल टीम

युनायटेड नॅशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम इंडियाने अभिनेत्री प्राजक्ता कोळी यांच्यासोबत भागीदारीची औपचारिक घोषणा केली आहे. UNDP इंडियाने प्राजक्ता कोळीची (Prajakta Koli) प्रथम युवा हवामान चॅम्पियन म्हणून (Young weather champion) निवड केली आहे. युथ क्लायमेट चॅम्पियन या नात्याने कोळी यांच्यावर हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि जैवविविधतेचे होणारे नुकसान याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तरुणांशी संवाद साधण्याची (Interact with young people) जबाबदारी सोपवली जाईल.

प्राजक्ता कोळी दीर्घकाळापासून मानसिक आरोग्य, महिलांचे हक्क, मुलींचे शिक्षण आदी विषयांवर विविध जागतिक सामाजिक जागरूकता मोहिमा राबवत आहे. जे समाजातील सर्व घटकांना विशेषतः गरिबांना जाणवत आहे. या सर्व समस्यांचा परिणाम उपेक्षित समुदायांवर, त्यांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर विशेषतः अर्थव्यवस्थेवर होत आहे. वास्तविक बदल घडवून आणण्यासाठी सरकार, समुदाय आणि व्यक्तींकडून कशी ठोस पावले उचलली जात आहेत यासारख्या काही परिणामकारक कथा शेअर केल्या जातील. प्राजक्ता (Prajakta Koli) हवामान बदलाचे दूरगामी उद्दिष्ट, तरुणांचा सहभाग आणि चांगले भविष्य सुनिश्चित करण्यासाठी काम करेल.

माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या या अनोख्या जबाबदारीसाठी माझी चॅम्पियन म्हणून निवड झाल्याने आनंदी आहे. UNDP भारताची पहिला युथ क्लायमेट चॅम्पियन (Young weather champion) या नात्याने मी अशा संधी निर्माण करू इच्छिते आणि त्यात सहभागी होऊ इच्छिते, ज्यात हवामान कृती आणि त्यावर घेतलेल्या तात्काळ उपाययोजनांबद्दल संवादाला पुढे नेले जाईल, अशी प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) म्हणाली.

उपयुक्त उपाययोजना तयार करण्याचा प्रयत्न करेन

तरुणांनी या मोहिमेत मशाल वाहक आणि सैनिक बनण्याची गरज आहे. जे समृद्ध आणि मजबूत भविष्याच्या समान ध्येयासाठी कार्य करतील. अशी दिशा जिथे मानवी प्रजातीला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही. ही समस्या आपणच निर्माण केली आहे. परंतु, आपण ती सोडवूही शकतो. UNDP सोबत मी जगभरातील तरुणांना सोबत घेऊन हवामान (Young weather champion) कृतीसाठी उपयुक्त उपाययोजना तयार करण्याचा प्रयत्न करेन, अशी प्राजकता कोळी (Prajakta Koli) म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: कामाच्या दिवशी लोकलचा मेगाब्लॉक! दोन दिवस रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार; नियोजन करून घराबाहेर पडण्याचं आवाहन

Pune: वादळी वाऱ्याच्या तडाख्यात हिरवं स्वप्न उद्ध्वस्त; पिंपरे परिसरात पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर

Pune Rave Party Raid : पुण्यात कथित हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर मध्यरात्री छापा, रिसॉर्टमधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update : बारामतीत कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांची हतबलता; ट्रकभर कांदा मेंढ्यांना चारा म्हणून

भूषण प्रधानच्या मनातील ‘स्वप्नसुंदरी’ २४ जुलैला भेटीला येणार! उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT