youth singing song in hospital video viral after his death 
देश

भावूक व्हिडिओ: 'अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना...'

वृत्तसंस्था

बंगळूरू : 'अच्छा चलता हूं, दुआओं मे याद रखना...' हे गाणे एका युवकाने रुग्णालयातील एका बेडवर बसून गायले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, व्हिडिओ पाहायला तो युवक जगामध्ये राहिला नाही. ऋषभ दत्ता असे या युवकाचे नाव आहे.

आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील काकोपोथर हे ऋषभचे गाव. दोन वर्षांपूर्वी त्याला अप्लास्टिक अॅनिमिया हा दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले होते. अनेक रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, तो बरा झाला नाही. उपचारादरम्यान त्याचा नऊ जुलै रोजी मृत्यू झाला. पण, त्याच्या आवाजातील व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होऊ लागले आहेत. शेवटचा व्हिडिओ रुग्णालयातील बेडवरील ठरला.

ऋषभच्या आवाजातील व्हिडिओ गेल्या वर्षी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याचा आवाज ऐकून अनेकजण त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडले होते. शिवाय, सोशल मीडियावर तो चर्चेतही आला होता. पण, आजाराने शेवटपर्यंत त्याची पाठ सोडली नाही. त्यानेही शेवटपर्यंत गाण्याचा आनंद लुटला. 'अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना...' हे त्याचे शेवटचे गाणे ठरले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ऋषभ रुग्णालयात एका बेडवर बसून हातात गिटार घेऊन गाणे गात आहे. यावेळी त्याचा आवाज ऐकण्यासाठी बाजूला नर्स आणि आरोग्य कर्मचारीही दिसत आहेत.

दरम्यान, ऋषभचा 'अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना...' हे शेवटचे गाणे ऐकून अनेकजण भावूक होत आहेत. शिवाय, प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदार तायडेंच्या भावाला ठार मारण्याचा कट; माजी मंत्री बच्चू कडूंसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

AI Relationship Coach : ‘तिला इंप्रेस कसं करायचं?’ ते ‘होकार कसा मिळवायचा?’; प्रेमातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता आहे AIकडे

Latest Marathi News Live Update: अशोक खरात आणि नार्वेकर यांच्यातील कॉल डिटेल्स आले समोर

Daund crime news: दौंड तालुक्यातील घरफोड्यांतील २ वर्षे फरार असलेला १२ गुन्ह्यांचा आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जेरबंद

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत ‘सालबर्डी’ येतोय..!

SCROLL FOR NEXT