landline 
देश

नव्या वर्षात तुमचा मोबाईल नंबर बदलणार; लँडलाईनवरुन कॉल करण्यासाठी TRAI चा निर्णय

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशभरात लँडलाईनवरुन मोबाईल फोनवर कॉल करण्यासाठी ग्राहकांना एक जानेवारीपासून मोबाईल नंबरच्या आधी शून्य लावणे अनिवार्य असणार आहे. दूरसंचार विभागाने यासंबंधातील ट्रायच्या प्रस्तावाचा स्विकार केला आहे. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायने याप्रकारच्या कॉलसाठी 29 मे 2020 पासून नंबरच्या आधी शूनय लावण्यास सांगितले आहे. दूरसंचार विभागाने 20 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या एका परिपत्रकात म्हटलंय की, लँडलाईनवरुन मोबाईलवर नंबर डायल करण्याच्या पद्धतीत आता बदल करण्याच्या ट्रायच्या सल्ल्याला स्विकारलं आहे. यामुळे मोबाईल आणि लँडलाईन सेवांसाठी आवश्यक प्रमाणात नंबर बनवण्याची सुविधा मिळेल. 

दूरसंचार विभागाने 20 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या एक सर्क्यूलरमध्ये म्हटलंय की लँडलाईनवरुन मोबाईलवर नंबर डायल करण्याच्या पद्धतीत बदल करण्याच्या TRAI च्या सल्ल्यांचा स्विकार केला आहे. या सर्क्यूलनुसार, या नियमांना लागू केल्यानंतर लँडलाईनवरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठी नंबरच्या आधी शून्य हा आकडा डायल करावा लागेल. दूरसंचार विभागाने म्हटलंय की दूरसंचार कंपन्यांना लँडलाईनच्या सर्व ग्राहकांना शून्य डायल करण्याची सुविधा द्यायला हवी.

ही सुविधा आपल्या क्षेत्राहून बाहेर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे. दूरसंचार कंपन्यांनी या नव्या व्यवस्थेला आत्मसात करण्यासाठी एक जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. डायल करण्याच्या या  पद्धतीत बदल केल्यामुळे दूरसंचार कंपन्यांना मोबाईल सेवेसाठी 254.4 कोटी अधिक नवे नंबर बनवण्याची सुविधा उपलब्ध होईल. यामुळे भविष्यातील गरजांना पूर्ण करण्यासाठी याचा फायदा होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT