शाळा Gallery
एज्युकेशन जॉब्स

दिवाळी सुट्टीचा घोळ मिटला! 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार शाळा

दिवाळी सुट्टीचा घोळ मिटला! 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार शाळा

तात्या लांडगे

11 नोव्हेंबरपासून नियमित शाळा सुरू होतील, असे पत्र माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविले आहे.

सोलापूर : दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने पहिल्यांदा दिलेल्या सुट्ट्यांचा कालावधी बदलून शिक्षण संचालकांनी 28 ऑक्‍टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली. त्यानंतर पुन्हा दिवाळी सुट्ट्यांमध्ये बदल होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, 11 नोव्हेंबरपासून नियमित शाळा सुरू होतील, असे पत्र माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर (Bhaskarrao Babar) यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविले आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिवाळी निमित्ताने 1 ते 20 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी राहील, असे आदेश सुरवातीला निघाले. त्यात पुन्हा बदल झाला आणि प्राथमिक शाळांना 1 ते 16 नोव्हेंबरपर्यंत सुट्ट्या राहतील, असे स्पष्ट करण्यात आले. तत्पूर्वी, 25 ऑक्‍टोबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टी देण्याचेही नियोजन झाले होते. हा घोळ संपत असतानाच पुन्हा दिवाळी सुट्टी वाढणार, असे सांगण्यात आले. माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्ट्या 76 दिवसांपेक्षा अधिक होणार नाहीत, असा नियम आहे. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा लवकर सुरू होऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑफलाइन पद्धतीने संपवावा लागणार आहे. कोरोनामुळे दीड वर्षापासून शाळा बंदच असल्याने 11 नोव्हेंबरपासून सर्व शाळा नियमितपणे सुरू होतील, असे आदेश मंगळवारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले. दिवाळी सुट्टीनंतर पहिलीपासूनचे सर्व वर्ग सुरू करण्याचे नियोजन झाले आहे.

12 नोव्हेंबरला राष्ट्रीय संपादणूक परीक्षा

शिक्षकांना दिवाळी सुट्ट्या 10 नोव्हेंबरपर्यंतच असणार आहेत. 11 नोव्हेंबरपासून नियमित शाळा सुरू होतील. 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, दिवाळी सुट्ट्यांचा कालावधी कमी झाल्याच्या तक्रारी असल्यास त्यावर वरिष्ठ पातळीवरून तोडगा काढला जाईल, असेही माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी आदेशातून स्पष्ट केले आहे. या आदेशातून त्यांनी शिक्षकांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्याध्यापकांना लेखी पत्र

जिल्ह्यातील सर्व शाळांना दिवाळीनिमित्त 10 नोव्हेंबरपर्यंतच सुट्टी राहील. 11 नोव्हेंबरपासून सर्व शाळा नियमितपणे सुरू होतील, यासंदर्भात सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना लेखी पत्र पाठविले आहे.

- भास्करराव बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT