Agriculture Diploma College in Nipani under Dharwad Agricultural University esakal
एज्युकेशन जॉब्स

Agriculture Diploma College : कृषी डिप्लोमा महाविद्यालय बंद होणार; काय आहे नेमकं कारण?

महाविद्यालयाने यंदा प्रवेश प्रक्रिया हाती न घेतल्याने पुढील वर्षी महाविद्यालय बंद होणार असल्याचे संकेत वर्तविण्यात आलेत.

सकाळ डिजिटल टीम

तात्पुरत्या काळासाठी हे महाविद्यालय जुलै २०१४ मध्ये येथील कृषी संशोधन केंद्रात हलविण्यात आले होते. त्यानंतर येथे महाविद्यालय आजतागायत नियमित व सुरळीत सुरू आहे.

निपाणी : धारवाड कृषी विद्यापीठांतर्गत (Dharwad Agricultural University) येथील कृषी संशोधन केंद्रात सुरू असणारे कृषी डिप्लोमा महाविद्यालय (Agriculture Diploma College) येत्या वर्षापासून बंद होणार आहे. हुक्केरी येथून हे महाविद्यालय काही काळासाठी येथे स्थलांतरित झाले होते, यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालय पुन्हा हुक्केरीत जाणार होते, तशी चर्चा होती; पण महाविद्यालयाने यंदा प्रवेश प्रक्रिया हाती न घेतल्याने पुढील वर्षी महाविद्यालय बंद होणार असल्याचे संकेत वर्तविण्यात आले आहेत.

शिक्षक (Teacher), स्टाफच्या पगारासाठी निधीचा कमतरता असल्याने आणि सध्या पुरेसा स्टाफ नसल्याने महाविद्यालय सुरू होणार नाही. यामुळे महाविद्यालयाचे हे शेवटचे वर्ष असून अखेरची बॅच येथे शिकत आहे. हुक्केरी येथे धारवाड कृषी विद्यापीठांतर्गत अॅग्रीकल्चर डिप्लोमा महाविद्यालय सुरू होते; पण महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत, जागा व मूलभूत सुविधांचा अभाव होता.

यामुळे तात्पुरत्या काळासाठी हे महाविद्यालय जुलै २०१४ मध्ये येथील कृषी संशोधन केंद्रात हलविण्यात आले होते. त्यानंतर येथे महाविद्यालय आजतागायत नियमित व सुरळीत सुरू आहे. मधल्या काळात महाविद्यालयासाठी हुक्केरी येथे जागा व निधी मंजूर झाल्याने हुक्केरीला हे महाविद्यालय कायमस्वरुपी स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. सध्या हुक्केरी येथे महाविद्यालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले आहे. यामुळे २०२४-२५ सालात हे महाविद्यालयाचे वर्ग हुक्केरीत सुरू होणार होते; पण महाविद्यालय प्रशासनाच्या माहितीनुसार हुक्केरीत देखील हे महाविद्यालय सुरू होणार नाही.

कारण, महाविद्यालयाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद घटला असून निधी उपलब्ध होत नसल्याची अडचण आहे. शिवाय सध्या पुरेसा स्टाफ नाही. एसएसएलसी झालेल्या उमेदवारांना या महाविद्यालयात प्रवेश मिळत. त्यासाठी प्रवेशाची जाहिरात निघाल्यावर आॅनलाईन अर्ज करावा लागत. त्यानंतर विद्यापीठाकडून अर्जधारकांचे आॅनलाईन कौन्सिलिंग होऊन त्यातून गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड होत होती. सेमिस्टर पद्धतीने येथे वर्ग चालतात. त्यासाठी प्रथम व द्वितीय वर्षातील मिळून ६० विद्यार्थ्यांच्या दोन बॅचेस सध्या येथे आहेत. विविध जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी येथे शिक्षणासाठी महाविद्यालयात येत. पण महाविद्यालय बंद झाल्यास असंख्य विद्यार्थी कृषी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.

विद्यार्थी कृषी शिक्षणासाठी महाराष्ट्रात

तत्कालीन कृषिमंत्री बी. सी. पाटील निपाणी भेटीवर आल्यावर आमदार शशिकला जोल्ले यांनी निपाणीत डिप्लोमासह कृषी पदवी महाविद्यालय निर्मितीसाठी मंजुरी देण्याची मागणी पत्राद्वारे केली होत; पण त्यानंतर कोणत्याही हालचाली येथे झाल्या नाहीत. निपाणी परिसर महाराष्ट्राच्या सीमेवर असून, येथील शेती सधन आहे. असंख्य शेतकरी प्रयोगशील शेती करतात. शेती असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असूनही महाविद्यालय नसल्याने महाराष्ट्रात कृषी शिक्षणासाठी जावे लागते. निपाणीत महाविद्यालय झाल्यास भागातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Akbar: महिलेचं अपहरण करणं मुघलांना पडलं होतं महागात! औरंगजेबच्या पणजोबाची कबर खोदून हाडं कोणी जाळली?

Latest Marathi Breaking News : बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी - वनमंत्री गणेश नाईक

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

SCROLL FOR NEXT