engineering 
एज्युकेशन जॉब्स

खुशखबर! आता इंजिनिअर होण्यासाठी गणित, भौतिकशास्त्राची नाही गरज 

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : इंजिनिअर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी गणित, भौतिकशास्त्र हे दोन विषय महत्त्वाचे मानले जातात. मात्र, आता 12 वीला हे दोन विषय घेण्याची आवश्यकता नसल्याचा महत्त्वाचा निर्णय ऑल इंडिया कॉन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (All India Council for Technical Education ) या संस्थेने घेतला आहे. त्यामुळे आता इंजिनिअर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांना गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय न घेतादेखील इंजिनिअर होता येणार आहे.

हेही वाचा - खुशखबर! कोरोना लसीची किंमत घटली; प्रति डोस 200 रुपयांपेक्षाही कमी येणार खर्च
इंजिनिअरिंगच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. मात्र, नव्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2021-22 या वर्षात AICTE ने नवीन निर्णय घेत विद्यार्थ्यांना खुशखबर दिली आहे. AICTE ने काही नियमांमध्ये बदल केला असून या दोन विषयांऐवजी अन्य 14 विषयांची नवी यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, 14 विषयांपैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी 45 टक्के गुण मिळणं गरजेचं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर आता अन्य विषयांची पार्श्वभूमी असलेले विद्यार्थीदेखील इंजिनिअरिंगचा अभ्यास करु शकतात असाही निर्णय या संस्थेने घेतला आहे.

हेही वाचा - गेल्यावर्षी हेल्थ सेक्टरवर सर्वांत जास्त सायबर हल्ले; जगभरात दर 10 सेकंदाला एक हल्ला
संस्थेने समावेश केलेले 14 विषय कोणते?
रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, बिझनेस स्टडीज, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जीवशास्त्र, इंजिनिअरिंग ग्राफिक्स आणि उद्योजकता या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. "विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता आम्ही काही नियमांमध्ये बदल केला आहे. वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आता जर इंजिनिअरिंगचाअभ्यास करायचा असेल तर ते विद्यार्थीदेखील यासाठी सक्षम होऊ शकतात. मात्र, त्यासाठी ठरवून दिलेल्या 14 विषयांपैकी तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी 45 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणं गरजेचं आहे", असं ऑल इंडिया कॉन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे उपाध्यक्ष एम.पी. पुनिया यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: सासवडमध्ये भाजपाचा डबल धमाका; प्रभाग २ आणि ९ पूर्णपणे भगवे

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : भाजपच नंबर एकचा पक्ष राहणार! निकालाआधीच काँग्रेसनं केलं मान्य अन् कारणही सांगितलं..

Kolhapur Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात, कागलमध्ये निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर लावल्याने तणाव; उत्कंठा शिगेला

U19 Asia Cup India Pakistan: कुमारांनाही आशिया कप जिंकण्याची संधी; पाकिस्तानविरुद्ध आज अंतिम सामना, भारताचे पारडे जड

SCROLL FOR NEXT