AAI मध्ये सिनिअर असिस्टंट पदांची भरती! 31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज Canva
एज्युकेशन जॉब्स

AAI मध्ये सिनिअर असिस्टंट पदांची भरती! 31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

AAI मध्ये सिनिअर असिस्टंट पदांची भरती! 31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

श्रीनिवास दुध्याल

भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे आयोजित वरिष्ठ सहाय्यक पदांसाठीची भरती अर्ज प्रक्रिया लवकरच संपणार आहे.

सोलापूर : भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे (AAI) (Airports Authority of India) आयोजित वरिष्ठ सहाय्यक पदांसाठीची भरती (Jobs) अर्ज प्रक्रिया लवकरच संपणार आहे. जुलै महिन्यात सुरू झालेल्या या पदांसाठीची नोंदणी प्रक्रिया 31 ऑगस्ट 2021 रोजी AAI बंद करेल. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात आणि अद्याप जे अर्ज करू शकले नाहीत, त्यांनी त्वरा करा. शेवटच्या तारखेनंतर कोणताही फॉर्म स्वीकारला जाणार नाही. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट aai.aero वर लॉग इन करावे लागेल. या भरती प्रक्रियेद्वारे 29 पदांची भरती केली जाईल. AAI या भरती प्रक्रियेत NE-6 पदांची भरती करेल.

या तारखा लक्षात ठेवा

  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू : 29 जुलै 2021

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2021

या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी योग्य पद्धतीने अर्ज करावा. यासाठी त्यांना एक फॉर्म भरावा लागतो जो अधिकृत नोटीससह दिला जातो. यानंतर तुम्ही भरलेला फॉर्म ई-मेल करू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पोस्टाद्वारेही अर्ज करू शकता.

असा करा वरिष्ठ सहाय्यक पदांसाठी ऑनलाइन अर्ज

वरिष्ठ सहाय्यक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रथम भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटला aai.aero भेट द्यावी. त्यानंतर भरती डॅशबोर्ड अंतर्गत उपलब्ध "एएआई रिक्रूटमेंट 2021 फॉर सिनिअर असिस्टंट पोस्ट्‌स'वर क्‍लिक करा. त्यानंतर वैकल्पिकरीत्या इच्छुक उमेदवार येथे दिलेल्या AAI भरती 2021 साठी थेट लिंकवर क्‍लिक करू शकतात. त्यानंतर अधिसूचनेत दिलेला फॉर्म डाउनलोड करा आणि सर्व तपशील काळजीपूर्वक भरा.

असा असेल पगार

  • सिनिअर असिस्टंट इन ऑपरेशन्स : 36,000 ते 1,10,000 रुपये

  • सिनिअर असिस्टंट इन फायनान्स : 36,000 ते 1,10,000 रुपये

  • सिनिअर असिस्टंट इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स : 36,000 ते 1,10,000 रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT