university grants commission university grants commission
एज्युकेशन जॉब्स

यूजीसीची मोठी घोषणा : एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करता येणार

सकाळ डिजिटल टीम

यूजीसी (UGC) अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. यूजीसी विद्यार्थ्यांना दोन पूर्ण-वेळ पदवी अभ्यासक्रम एकाच वेळी भौतिक मोडमध्ये शिकण्याची परवानगी देणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी मंगळवारी (ता. १२) याची घोषणा केली. (university grants commission)

विद्यार्थी आता एकाच विद्यापीठात किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांमधून दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील. विद्यापीठ अनुदान आयोग लवकरच या संदर्भात तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये (NEP) जाहीर केल्यानुसार आणि विद्यार्थ्यांना अनेक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे, असे जगदीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बारावीचा निकाल लागल्यानंतर लवकरच महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्यास परवानगी देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) नवीन मार्गदर्शक तत्त्वे घेऊन येत आहे. ज्यायोगे विद्यार्थ्यांना दोन पदवी अभ्यासक्रम एकाच वेळी भौतिक पद्धतीने करता येतील, असेही जगदीश कुमार यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना (Student) ऑफलाइन किंवा ऑनलाइन दोन पदवी अभ्यासक्रम करण्याची परवानगी दिली जाईल. बुधवारी यूजीसीच्या वेबसाइटवर जाहीर केल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील. मार्गदर्शक तत्त्वे वैधानिक संस्था आणि उच्च शिक्षण संस्था (HEIs) नियंत्रित करू शकतात. उपस्थिती अनिवार्य असेल की नाही याचा निर्णय विद्यापीठे (University) घेतील. यूजीसीने तसे आदेश दिलेले नाही, असेही आभासी बैठकीत जगदीश कुमार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT