Banking GOOGLE
एज्युकेशन जॉब्स

Banking : पदवीधरांसाठी SBIमध्ये नोकरीची संधी

या भरतीद्वारे एकूण 1,673 PO पदे भरली जातील.

नमिता धुरी

मुंबई : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट देऊ शकतात. या भरतीद्वारे एकूण 1,673 PO पदे भरली जातील. उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे. (SBI PO Recruitment 2022)

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - 1,673

वय मर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया - 22 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ ऑक्टोबर २०२२

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.

अर्ज फी

पीओ पदासाठी अर्ज करणार्‍या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 750 रुपये भरावे लागतील, तर अनुसूचित जाती, जमाती आणि अपंग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

निवड प्रक्रिया

निवड होण्यासाठी उमेदवारांना प्रिलिम्स, मुख्य आणि सायकोमेट्रिक चाचणी या तीन टप्प्यांच्या प्रक्रियेतून जावे लागेल.

परीक्षेची तारीख

उमेदवारांनी नोंद घ्यावी की पूर्वपरीक्षा १७, १८, १९, २० डिसेंबर रोजी होणार आहे. तर मुख्य परीक्षा 2023 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यात होण्याची शक्यता आहे. मार्च 2023 पर्यंत निकाल जाहीर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT