find best courses after 10th esakal
एज्युकेशन जॉब्स

Career After SSC: 10 वी नंतर पुढे काय? 'या' पर्यायांचा एकदा विचार करा, वेळ अन् पैसे दोन्ही वाचतील

Find best courses after 10thविद्यार्थ्यांकडे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर करिअर करण्यासाठी अनेक पर्याय असतात.

Aishwarya Musale

Career After SSC: विद्यार्थ्यांकडे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर करिअर करण्यासाठी अनेक पर्याय असतात. पण सर्वात महतवाची गोष्ट म्हणजे दहावीनंतर आपण कोणता कोर्स निवडता यावर हे तुमचं पुढील भवितव्य अवलंबून असतं.

दहावीनंतर घरचे म्हणतात म्हणून किंवा मित्राने केलं म्हणून इंजिनिअरिंगल ऍडमिशन घेतलं जातं. पण खरं तर त्यावेळी आवड कशात आहे हे पाहणं गरजेचं असतं. तेच न केल्याने विद्यार्थांचा वेळ आणि पालकांचे पैसे वाया जातात.

विद्यार्थी दहावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रम करू शकतात. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयटीआय अभ्यासक्रमदेखील खूप लोकप्रिय आहेत. तसेच आयटीआयमध्ये बरेच ट्रेड असतात, ज्यातून विद्यार्थी त्यांच्या आवडीचे विषय निवडू शकतात.

नेहमी विद्यार्थी लोकप्रिय कोर्सकडे धाव घेतात. त्या कोर्समधून हजारो मुलं शिक्षण घेतात. त्यातली अनेक बेरोजगारच राहतात. याउलट फुटवेअर टेक्नॉलॉजी, मेटलर्जीसारख्या विषयातून राज्याभरातून अवघी 120 मुलंच दरवर्षी बाहेर पडत असल्याने त्यांना लगेच नोकरी मिळते.

इथे आम्ही अशा 5 डिप्लोमा कोर्सेसबद्दल सांगत आहोत जे 10वी नंतरच करता येतात. म्हणजेच हा कोर्स करून तुम्ही लवकरच तुमच्या पायावर उभे राहू शकता.

1. हॉटेल मॅनेजमेंट - आजकाल हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये खूप वाव आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला हॉस्पिटॅलिटीमध्ये करिअर करायचे असेल, तर तुम्ही दहावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा करू शकता. हा डिप्लोमा करून या क्षेत्रात नोकरी मिळवणे सोपे होईल.

2. कॉम्पुटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग - संगणकाच्या युगात हा एक उत्तम पर्याय असू शकतो. या क्षेत्रात, तुम्हाला संगणक दुरुस्ती आणि नेटवर्किंगशी संबंधित माहिती मिळते जी चांगली नोकरी मिळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

3. इंजीनियरिंग डिप्लोमा - अनेक संस्था आणि पॉलिटेक्निक महाविद्यालये 10वी नंतर अभियांत्रिकी डिप्लोमा देतात. हे केल्यानंतर, तुम्हाला अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित मध्यम स्तरावरील नोकऱ्या सहज मिळू शकतात.

4. ITI (इंडस्ट्रियल ट्रेनिंग)- 10वी नंतर ITI हा देखील चांगला पर्याय आहे. इलेक्ट्रीशियन, वेल्डर, फिटर, कारपेंटर, मेकॅनिक, स्टेनो, कॉम्प्युटर असे अनेक विषय आहेत. यामध्ये फार मोठ्या नोकऱ्या नाहीत, पण तुम्हाला स्वतःचे काही काम करायचे असेल तर हा कोर्स करून तुम्ही सहज चांगले पैसे कमवू शकता.

5. स्टेनोग्राफी आणि टायपिंग - तुम्ही 10वी नंतर स्टेनोग्राफी आणि टायपिंगमध्ये डिप्लोमा देखील करू शकता. काही राज्यांमध्ये, स्टेनोग्राफी हा विषय 11वी आणि 12वी मध्ये देखील निवडला जाऊ शकतो. न्यायालय आणि इतर अनेक सरकारी कार्यालयांमध्ये अशा रिक्त जागा येत राहतात, ज्यासाठी स्टेनो अनिवार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT