Knowledge For Students esakal
एज्युकेशन जॉब्स

Knowledge For Students: विद्यार्थ्यांसाठी Career Guidance का महत्वाचे?

विद्यार्थ्यांना करियरचा योग्य मार्ग मिळावा यासाठी करियर गायडंस महत्वाचा ठरतो

सकाळ डिजिटल टीम

knowledge News: एका विशिष्ट वर्गानंतर विद्यार्थ्यांना पुढील करियर कशात घडवायचे याबाबत टेंशन यायला लागतं. डिग्री कशात करायची, जे शिक्षण घेतोय त्यात पुढे संध्या आहेत काय अशा अनेक प्रश्नांचा एकाच वेळी विद्यार्थांच्या डोक्यात भडीमार झालेला असतो. मात्र यातून त्यांना योग्य मार्ग मिळावा यासाठी करियर गायडंस त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरतो. आता विद्यार्थ्यांसाठी करियर गायडंस का महत्वाचे आहे तेही जाणून घेऊया.

करियर गायडंसला एक प्रकारचा काऊंसिलींग प्रोग्रामही म्हटल्या जातं. विद्यार्थ्यांचे कौशल्य, त्यांना अवगत असलेली माहिती आणि अनुभव यांच्या आधारावर त्यांची चाचणी केली जाते. मात्र भारतात करियर गायडंस ही संकल्पना लोकांना फार कमी प्रमाणात अवगत असलेली आहे.

अलीकडेच केल्या गेलेल्या सर्वेनुसार, 93% विद्यार्थ्यांना फक्त मर्यादित करियर ऑप्शन्सच माहिती आहेत. उदा, इंजीनियरींग, मेडिसीन, लॉ, फायनांस, आयटी असे काही करियर ऑप्शन्स सोडता विद्यार्थ्यांना त्यांच्या आतील कला गुणांचीही ओळख नसते. ग्रामीण भागांमध्ये याबाबत विद्यार्थ्यांना अजिबात माहिती नसते.

करियर गायडंस का महत्वाचे?

करियर अॅडवायझर किंवा काऊंसिलर विद्यार्थ्यांचं ज्ञान वाढवण्यास त्यांच्या कला गुणांना वाव देण्यास निपूण असतात. तुमच्या सुप्त गुणांना ते जाणून घेत तुम्हाला करियरची योग्य दिशा दाखवण्यात मदत करतात. करियर काऊंसिलर तुमचा इंटरेस्ट चेक करत तुमची अॅप्टिट्युड टेस्ट घेतात. त्यातून तुमच्या कला, तुमचे गुण दिसून येतात. ही टेस्ट विद्यार्थ्यांना त्यांची पुढील करियर पाथ निवडण्यास मदत करते. (Career News)

जागतिक पातळीवर विचार केल्यास जगभऱ्यात 250 विद्यार्थांमधून एक 1 विद्यार्थी करियरबाबत गायडंस घेत असल्याचे दिसून येते. एका सर्वेतून असे निदर्शनास आले आहे की, जगभऱ्यातील 350 विद्यार्थ्यांमागे 1.4 मीलीयन काऊंसिलरची गरज आहे. यामुळे कोट्यावधी विद्यार्थ्यांना त्यांची करियर पाथ निवडण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crude Oil Price Drop : पेट्रोल-डिझेल सह LPG स्वस्त होणार? अमेरिका- इराणमधील तणाव निवळताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण

जांभळाचे सडे म्हणजे दुष्काळाची चाहूल नव्हे! हे नैसर्गिक असल्याचा तज्ञांचा दावा, मग जांभूळ जास्त का येते?

Rajya Sabha Majority: ‘एनडीए’ दोन तृतीयांश बहुमताजवळ, राज्यसभेतील संख्याबळ वाढणार; इंडिया आघाडीचे बळ घटले, महाराष्ट्रातील २ पक्षात भूकंप?

Tandulwadi Accident : इरफान बनला 'देवदूत'! चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत मारली उडी अन् चौघांचा वाचवला जीव; डोळ्यांदेखत गाडी 200 फुटांवरूनच...

Karad Accident: सुटीचा आनंद ठरला दुर्दैवी! गणपतीपुळ्याच्या प्रवासात तरुण अभियंत्याचा मृत्यू, कार ३०० फूट खड्ड्यात, तीन मित्र अन् मध्यरात्री काय घडलं..

SCROLL FOR NEXT