What to Do After 12th: Esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Guidance After 12th: बारावी नंतर पुढे काय? जाणून घ्या, करिअरसंबंधित अतिशय महत्वपूर्ण माहिती

What to Do After 12th: बारावी नंतर काय? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांपेक्षा पालक सातत्याने विचारत असतात. तर बारावीनंतर काय निवडायचे, हे जाणून घेऊयात..

Monika Shinde

What to Do After 12th: बारावी नंतर काय? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांपेक्षा पालक सातत्याने विचारत असतात. अर्थात स्वाभाविक आहे, कारण बारावीनंतर अनेक प्रश्न त्यांना भेडसावत असतात. वाणिज्य शाखेच्या मुलांना वाणिज्य शाखेशिवाय कला शाखेतही जाता येतं. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे अनंत प्रश्न येतात... तर बारावीनंतर काय निवडायचे, हे जाणून घेऊयात..

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा एक काळ असा होता की, एकतर अभियांत्रिकी किंवा मेडिकलला जात असत किंवा ते स्वप्न पाहत असत पण हल्ली मेडिकलच्या जागा वाढल्यामुळे किंवा एकूणच त्या शाखेकडे कल वाढल्याने मेडिकलला जाण्याचा ओघ मुलांचा वाढलेला आहे. विद्यार्थी मग नीट परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी बाहेर अनेक ठिकाणी जातात.

जसे कोटा किंवा पंढरपूर किंवा शिंदेवाडी आणखीन काही ठिकाणी आणि मग तिथे भरमसाठ फी भरून येनकेनप्रकारे अभ्यास करतात. वास्तविक हा विषय असा आहे की, मला खरंच डॉक्टर व्हायच आहे का? का माझा पिंड वेगळा आहे. असा विचार जो करतो त्याला काहीतरी करण्याची धडपड असते. काय करावं इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी सोडून ज्या शाखा आहेत त्याविषयी खरतर मी आज लिहिणार आहे.

वास्तविक बीएस्सी करणं हे बऱ्याचवेळा फायद्याचा ठरतं. ते केल्यानंतर अनेक गोष्टींकडे जात येतं. ज्यांचा पिंड संशोधनाचा आहे. शास्त्रज्ञ ज्यांना बनवायचा आहे, त्यांना अनेक शाखा खुणावत असतात. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, स्टॅटिस्टिक, मॅथेमॅटिक्स, जिओलॉजी, जॉग्राफी असे अनेक विषय आहेत यापैकी कुठल्याही एका विषयात बीएसस्सी करून मग एमएस्सी करता येतं.

एम.एस्सी केल्यानंतर मग किंवा पीएच.डी चा अभ्यासक्रम हाती घेता येतो. याच्या अनेक संधी आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे किंवा महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत. मला इतर कुठलीही तार छेडायची गरज नाही.

कदाचित ही तार छेडताना मलाच माझ्या लक्षात येईल की, अरे मला संशोधक व्हायचंय, मला वकील व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला कवी व्हायचंय, मला साहित्य क्षेत्रात नाव कमवायचंय, मला क्रियेटीव्ह राईटर व्हायचंय, मला नवनिर्मितीचा आनंद घ्यायचा आहे, मला चित्रपट क्षेत्रात काम करायचे, मला उत्तम फोटोग्राफर व्हायचे, जे काही असेल मी सांगत नाही ज्याने त्याने आपलं आपण ठरवायचं.

परदेशात सुद्धा खूप मोठी संधी पूर्वीच्या काळामध्ये उपलब्ध होती. पण आता कोरोनामुळे किती संधी उपलब्ध होईल किंवा पालक आपल्याला बाहेर जाऊ देतील का किंवा आपण तरी बाहेर जाऊ का, असे प्रश्न आपल्याला येण्याची शक्यता आहे.

मग सगळ्यात सोपा पर्याय काय? तर भारतातल्याच विद्यापीठांमधून विशेषता आपल्याच विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणे जास्त सुकर ठरेल. बी.एस्सी. करीत असताना आपण अनेक गोष्टी करत असतो. जसे राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना किंवा क्रीडा विभागाच्या माध्यमातून आपल्याला आपलं क्रीडा करिअर उभा करता येऊ शकतं.

अगदी मला वाटतं बी.एस्सी. करीत असताना पुरुषोत्तम, फिरोदिया किंवा सकाळ करंडक सारख्या वेगवेगळ्या स्पर्धांमधून विशेषता एकांकिका, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा इत्यादी स्पर्धांमधून भाग घेऊन सुद्धा अनेकांनी आपलं करियर केलेलं आहे. एकदा करिअर म्हटलं की, आपल्याला प्रश्न पडतो की, नक्की काय करायचं? करिअरकडे बघताना मला नक्की काय करायचं आहे हे एकदा ठरवायला हवं.

लोक काय म्हणतायेत यापेक्षा मी की काय ठरवतोय, मला काय करायचे, आम्हाला काय व्हायचंय आपल्या प्रत्येकाला स्वतःचा आतला एक आवाज असतो या आतल्या आवाजाला एकांतात एकदा जरी विचारलं मी कोण होणार मला कोण व्हायचंय मग प्रश्नाचे उत्तर देणे सोपं जातं. असा प्रश्न पण विचारत गेलो की मग आपण उत्तर शोधत जाऊ मग एकदा तरी उत्तराकडे तार छेडली जाईल ती तार कुठली हे एकदा कळलं की स्पर्धा परीक्षा ज्यांना करायची आहे त्यांनी पहिल्यापासून अभ्यास केला पाहिजे. स्पर्धा परीक्षा कशी करायची हा एक लेखाचा विषय होऊ शकतो. पण एकदा मी जर्मनीच्या एका विद्यापीठात गेलो होतो.

तिथे मी पाहिलं की बी .एस्सी. केमिस्ट्री झालेल्या मुलाला एम.एस्सी. फिजिक्स, मायक्रोबायोलॉजी किंवा इतर कुठल्याही जैवविविधता असलेल्या विषयात प्रवेश घ्यायला लावतात आणि म्हणून तर कॉटिन्जन विद्यापीठात 40 पेक्षा जास्त नोबल प्राईज विनर्स आहेत. आपल्याकडे नोबल प्राइज का कमी मिळतात कदाचित हा एक विषय होऊ शकतो. कारण आपल्याकडे आपण इंटर डिसिप्लिनरी अर्थात आंतरशाखीय किंवा आंतर विषय यासाठी कमी काम करतो.

कुठलाही विषय अभ्यासासाठी वर्ज्य असता कामा नये त्यामुळे आपण प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर जेवढे विषय आपल्याला आहेत त्याच्या पलीकडे आणखी काय काय करता येईल याचा विचार आपण करू शकतो. त्याचबरोबरीने आपण इतर पण गोष्टी करू शकतो, जसे क्रीडा क्षेत्रात करिअर जर करायचं असेल तर एखादा जो आपला आवडीचा खेळ आहे त्या खेळासाठी रोज सातत्याने ज्याला रियाज म्हणतात गाण्याच्या भाषेमध्ये तशी वेळ दिली पाहिजे. सातत्याने जर प्रयत्न करीत राहिलं तर आपण अनेक खेळांमध्ये नाव कमवू शकतो.

ज्याला वक्तृत्व, वादविवाद, एकांतिका किंवा एकूणच नाटक सिनेमा ह्या क्षेत्रात जायचं असेल त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. यामध्ये पहिल्यापासून जर प्रयत्न केले तर यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी करता येतील. मला सांगायला अभिमान वाटतो की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच एक लिबरल आर्ट या नावाने एक वेगळी शाखा सुरू केलेले आहे. ज्या मुलांना वेगळं काहीतरी करायचं आहे नाविन्यपूर्ण, सृजनात्मक असं काहीतरी करावं वाटतं त्या मुलांनी या लिबरल आर्टला जरूर प्रवेश घ्यावा.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातच ललित कला केंद्र आहे तिथेही अशी मुलं सांस्कृतिक कार्यक्रमात किंवा सांस्कृतिक जडण-घडण यामध्ये ज्यांना काम करायचे आहे ती काम करू शकतात.

संशोधनांमध्ये आपल्याकडे त्या मानानं खूप चांगलं काम चालतं. ज्यांना संशोधन करायचं आहे त्यांनी आतापासूनच संशोधनाधिष्ठित शिक्षण पद्धतीचा अवलंब करून प्रथम वर्षाच्या विज्ञानापासून सातत्याने काहीतरी प्रयोग करत, प्रकल्प करत मग पुढे जाव की, जेणेकरून बी.एस्सी. झाल्यानंतर किंवा एम.एस्सी. झाल्यानंतर त्याला त्या विषयात विद्यावाचस्पती करणं किंवा संशोधनातून अनेक गोष्टी करणं, पेटंट घेणे किंवा शोधनिबंध प्रकाशित करणे हे सगळं जमू शकेल.

ज्यांना समाजसेवेच्या माध्यमातून काम करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी बी.एस्सी. बरोबरच राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभाग घ्यावा. राष्ट्रीय सेवा योजनेमधून करियर करणारे अनेक विद्यार्थी आहेत. त्या मुलांना अनेक गोष्टींमध्ये काम करता येतं. म्हणजेच बी.एस्सी. करीत असताना समाजसेवेचे व्रत घेऊन समाजासाठी काहीतरी देणे लागतो. या उक्तीने ही मुलं काम करतात बीएस्सी झाल्यानंतर मास्टर डिग्री करून किंवा एम एस डब्ल्यू ला प्रवेश घेऊन कुठल्यातरी एनजीओ बरोबर किंवा स्वतःची एनजीओ स्थापन करून आपण समाजासाठी काही काम करू शकतो.

ज्या मुलांना मिलेक्ट्री मध्ये किंवा सैन्यामध्ये भरती व्हायचं आहे त्यांनी बी.एस्सी. करीत असताना बी.कॉम., बी.ए. करत असताना एनसीसी मध्ये अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये सहभागी व्हाव राष्ट्रीय छात्र सेनेत बी सर्टिफिके सी सर्टिफिकेट पास होऊन हे मुलं एसएसबी म्हणजे शॉर्ट सर्विस बोर्ड मध्ये पास होऊन अप्लाय करू शकतात सी.डी.एस. ला कम्बाईन डिफेन्स सर्विसेसच्या परीक्षा पास होऊ शकतातआणि आणि यातून मिलिटरीमध्ये यांना टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल जागांवर प्रवेश मिळू शकतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT