HSC Students
HSC Students sakal
एज्युकेशन जॉब्स

HSC RESULT: कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी CA, CS व्यतिरिक्त करा 'हे' कोर्स

सकाळ डिजिटल टीम

HSC Result 2022 : तुमच्यापैकी अनेकांनी यंदा 12 वी कॉमर्सची परीक्षा दिली असेल आणि रिझल्टनंतर पुढे काय करायचं आहे याचंदेखील अनेकांनी नियोजन केले असेल. काहींनी बारावीच्या अभ्यासासोबतच आपले ध्येय निश्चित केले असेल, पण अनेक विद्यार्थी अजूनही त्यांच्या करिअरबाबत संभ्रमात असतील. आज आम्ही तुम्हाला कॉमर्ससह बारावी केल्यानंतर कोणते कोर्स करू शकता, ज्यामध्ये यशाची शक्यता अधिक जास्त आहे. यासोबतच आम्ही तुम्हाला B.Com, CA, CS, BBA व्यतिरिक्त अशा अनेक पर्यायांबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही चांगले करिअर करू शकता. (Career Opportunity For Commerce Student After 12th B.com )

विविध विषयांमध्ये पदवी

कॉमर्समधून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पहिली पायरी म्हणजे बी.कॉम करणे होय, परंतु केवळ बी.कॉम केल्याने तुमचे करिअर चांगले बनत नाही. आजकाल बरेच लोक B.Com पास आहेत, पण त्यांना नोकरी मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे B.Com चे शिक्षण घ्या पण, हे करताना विशिष्ट विषयात प्राविण्य मिळवण्याकडे भर द्या. यामुळे चांगली नोकरी मिळवणे सहज शक्य येईल. यासाठी अकाउंटिंग आणि फायनान्स हा उत्तम पदवी पर्याय आहे. या अंतर्गत तुम्ही अकाउंट्स, फायनान्स, टॅक्सेशन असे सुमारे 39 विषय शिकवले जातात, जे तुमच्यासाठी करिअरच्या अनेक संधीचे मार्ग नव्याने खुले करण्यासाठी मदतगार ठरू शकतात.

यासोबतच तुम्ही B.Com, बँकिंग आणि इन्शुरन्समध्ये देखील पदवी करू शकता. या पदवीमध्ये बँकिंग आणि विमा उद्योगात समाविष्ट असलेल्या विषयांचा पद्धतशीर अभ्यास शिकवला जातो. यानंतर तुम्ही सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील ऑडिटिंग, अकाउंटन्सी, बँकिंग, फायनान्स या क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकता.

CWA

कॉमर्समधून 12वी केल्यानंतर, बहुतेक लोक सीए किंवा सीएस करण्याकडे धावतात. परंतु, या कोर्समध्ये आता पूर्वीच्या तुलनेने स्पर्धा अधिक वाढली आहे. त्यामुळे तुम्ही सीए सारखा कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट कोर्सही करू शकता. हा कोर्स The Institute of Cost and Works Accountant of India Cost Accountancy द्वारे चालवला जातो आणि त्यात अनेक टप्पे आहेत. ICWA च्या कोर्समध्ये प्रथम फाउंडेशन कोर्स करावा लागतो. त्यानंतर पुढील प्रक्रियेत इंटरमिजिएट, फायनल परीक्षेत सहभागी होऊन कोर्स पूर्ण करून तुम्ही तुमचे करिअर सुधारू शकता. हा कोर्स केल्यानंतर नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात.

कायदा

यापूर्वी केवळ पदवीधर उमेदवारांना कायद्याचा अभ्यास करता येत होता, परंतु नवीन नियमांनुसार उमेदवार बारावी उत्तीर्ण झाल्यानंतरही कायद्याचा अभ्यास करू शकतात. या अभ्यासक्रमाद्वारे वाणिज्य शाखेशी संबंधित कायद्याचा अभ्यास करता येतो. सध्या वाणिज्य शाखेशी संबंधित कायद्याचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना मागणी असून त्यांच्यासाठी रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. याद्वारे तुम्ही बँकिंग कायदा, कंपनी कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, औद्योगिक कायदा, वित्त संबंधित कायदा इत्यादींचा अभ्यास करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर

तुम्हाला पर्सनल फायनान्स, वेल्थ मॅनेजमेंट, इन्शुरन्स प्लॅनिंग, म्युच्युअल फंड या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर, हा कोर्स तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो. जर तुम्हाला आर्थिक नियोजन क्षेत्रात उतरायचे असेल तर, CFP कोर्स तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. FPSB India यासाठी परवाना प्रदान करते. याच्या मदतीने तुम्हाला अनेक क्षेत्रात सहज नोकरी मिळू शकते.

इतर अभ्यासक्रम

असे अनेक कोर्सेस आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पर्यायांची निवड करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही विशिष्ट विषयातून बारावी उत्तीर्ण होण्याची गरज नाही. कॉमर्स व्यतिरिक्त इतर कोर्स करूनही तुम्ही तुमचे करिअरही अगदी चांगले घडवू शकता. यामध्ये तुम्ही इकॉनॉमिस्ट, स्टॅटिस्टीशियन, चार्टर्ड अकाउंटंट, अकाउंटंट एक्झिक्युटिव्ह, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटंट, टॅक्स ऑडिटर, टॅक्स कन्सल्टंट, ऑडिटर, इन्व्हेस्टमेंट अॅनालिस्ट, फायनान्स अॅनालिस्ट, फायनान्स कंट्रोलर, फायनान्स प्लॅनर, फायनान्स कन्सल्टंट, फायनान्स मॅनेजर आदींमध्ये प्राविण्य मिळवून उत्तम करिअर करू शकता. याशिवाय तुम्ही स्टॉक ब्रोकर, पोर्ट फोलिओ तुम्ही मॅनेजर बनून चांगले करिअर करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT