Exam
Exam 
एज्युकेशन जॉब्स

CAT 2021 मध्ये 9 जणांना 100 टक्के गुण, महाराष्ट्रातील चार जण

सकाळ डिजिटल टीम

सलग चौथ्या वर्षी यामध्ये टॉपला मुलंच आहेत. टॉपर्सच्या यादीत पहिले सात जण हे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत.

नवी दिल्ली - कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१ च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आयआयएम अहमदाबादने निकाल जाहीर केला असून गुणपत्रक जारी केले आहेत. उमेदवारांना परीक्षा पोर्टलवर त्यांचा निकाल पाहता येईल. दरम्यान, या परीक्षेत ९ उमेदवारांनी १०० टक्के गुण मिळवले असल्याची माहिती समोर आली आहे.

सलग चौथ्या वर्षी यामध्ये टॉपला मुलंच आहेत. टॉपर्सच्या यादीत पहिले सात जण हे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. तर इतर दोन इतर शाखांचे असल्याची माहिती कॅट २०२१ परीक्षेचे समन्वयक एमपी राम मोहन यांनी दिली. विशेष म्हणजे १०० टक्के मिळवणाऱ्यांच्या यादीत सर्वाधिक महाराष्ट्रातले ४ जण आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशचे दोन आणि पश्चिम बंगाल, हरयाणा, तेलंगणा या राज्यातील प्रत्येकी एकाने १०० टक्के गुण मिळवले आहेत.

कॅट २०२१ च्या परीक्षेत १ लाख ९२ हजार मध्ये महिलांचे प्रमाण फक्त ३५ टक्के होते. त्यापैकी कोणालाही १०० टक्के गुण मिळवता आले नाहीत. टॉप २० मध्ये दोन महिलांना आणि तीन नॉन इंजिनिअर्सना २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेत स्थान मिळालं होतं. त्यानंतर आतापर्यंत मुलांनीच या परीक्षेत अव्वल स्थान पटकावलं आहे. CAT 2021 च्या परीक्षेत ९९.९९ टक्के गुण मिळवणारे १९ उमेदवार हे पुरुषच आहेत. तर यातील १६ जण हे इंजिनिअरिंगचे असून तिघेजण इतर शाखेचे विद्यार्थी आहेत. तर 99.98 टक्के गुण मिळवलेल्या १९ उमेदवारांमध्ये एक महिला आहे. तर १५ जण हे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत.

CAT 2021 परीक्षा २८ नोव्हेंबर, २०२१ रोजी भारतात घेण्यात आली होती. भारतातील १५६ शहरांमध्ये ४३८ केंद्रांवर या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. आयआयएम CAT 2021 च्या आधारे यानंतरच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नवी यादी जाहीर करणार आहे. तसंच इतर ८८ संस्थासुद्धा प्रवेशासाठी या वर्षी CAT 2021 परीक्षेच्या गुणांचा वापर करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भूषण पाटील यांना काँग्रेसकडून देण्यात आला AB फॉर्म

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Viral Video: पत्नी जावायाच्या प्रेमात पडल्याचे कळताच पतीने लावून दिले लग्न, टाळ्यांच्या कडकडाटात गावानेही केले स्वागत

Mazi Tuzi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ'चा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला; मालिकेत करण्यात आले 'हे' बदल

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

SCROLL FOR NEXT