India_Post 
एज्युकेशन जॉब्स

Govt Jobs: दहावी पास तरुण-तरुणींसाठी नोकरीची संधी; पोस्टात होणार भरती!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दहावी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार आणि स्वयंरोजगार असलेल्या पात्र तरुण-तरुणींना शहरातील पश्‍चिम विभाग आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी एजंट म्हणून नेमण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 आहे. 

बेरोजगार, स्वयंरोजगारीत तरुण, सेवानिवृत्त सैनिक, पूर्वी विमा प्रतिनिधी म्हणून काम केलेल्या व्यक्ती, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ सदस्या, सेवानिवृत्त शिक्षक बचत गट प्रतिनिधी आणि वरील अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्ती यांची नेमणूक मुलाखतीद्वारे करण्यात येईल.

इच्छुकांनी येत्या 11 जानेवारीपर्यंत चार फोटो, दहावी अथवा समतुल्य परीक्षेची मार्कलिस्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड झेरॉक्‍ससह कागदपत्रे येथील कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष जमा करावेत. अथवा येत्या 11 जानेवारीपर्यंत लोकमान्य नगर, पोस्ट कार्यालय, शास्त्री रस्ता, दांडेकर पुलाजवळ, पुणे -411030 या पत्त्यावरील पोस्ट कार्यालयात कागदपत्रे प्राप्त होतील असे पाठवावेत. मुलाखतीस येताना उमेदवारांनी संबंधित मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे शहर पश्‍चिम विभागाचे डाकघर अधीक्षक यांनी केले आहे. 

पात्रता : 
- उमेदवार इयत्ता दहावी अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा. 
- उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षादरम्यान असावे. 
- संगणकाचे आणि स्थानिक ठिकाणाचे ज्ञान असावे. 
- इतर कोणत्याही कंपनीचा आयुर्विमा व्यवसाय करीत नसावा. 
- उत्तीर्ण उमेदवारास पाच हजार रुपये सिक्‍युरीटी डिपॉजिट ठेवणे बंधनकारक 
- उमेदवारास अतिरिक्त प्रशिक्षण दिल्यानंतर परवाना मिळण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य

अधिक माहितीसाठी संपर्क : 
सागर पिंगळे, वरिष्ठ विकास अधिकारी 
मोबाईल क्रमांक - 9404962305 किंवा
कार्यालयीन पत्ता - लोकमान्य नगर, पोस्ट कार्यालय, शास्त्री रस्ता, दांडेकर पुलाजवळ, पुणे - 411030 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UGC NET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तुमचा विषय कधी आहे?

T20 World Cup साठी आज भारतीय संघाची घोषणा, कुणाला संधी, कोण बाहेर? 'या' पाच प्रश्नांची मिळणार उत्तरं...

थरारक प्रसंग! मृत्यूच्या दाढेतून परतले महसूल अधिकारी! माळशिरस महामार्गावर दोन तरुणांच्या धाडसामुळे वाचले प्राण, क्षणभर उशीर झाला असता तर...

Mumbai Mega Block : मुंबईत ब्लॉकमुळे उद्या १३ रेल्वेंवर परिणाम

Vidarbha Cold Wave: विदर्भात थंडीचा कडाका: नागपूर पारा ८.५ अंश, गोंदियेत ८ अंश सेल्सिअस

SCROLL FOR NEXT