Cognizant
Cognizant  Google file photo
एज्युकेशन जॉब्स

मोठी बातमी : यंदा कॉग्निझंट २८ हजार फ्रेशर्सची भरती करणार

वृत्तसंस्था

यंदा भरतीच्या जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. यामध्ये आयटी क्षेत्राचाही (IT Sector) समावेश आहे. त्यामुळे जॉबच्या (Jobs) शोधात असलेले फ्रेशर्सदेखील अडचणीत आले आहेत. आयटी क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या फ्रेशर्ससाठी (Freshers) एक दिलासादायक बातमी आहे. आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी कॉग्निझंटने (Cognizant) यावर्षी २८ हजार फ्रेशर्सची भरती करण्याची घोषणा केली आहे. (Cognizant to hire 28,000 Indian freshers this year)

गेल्या वर्षी २०२०मध्ये १७ हजार फ्रेशर्सची नियुक्ती केली होती. यंदा यात १८ टक्के वाढ करण्यात आली आहे. कॉग्निझंटच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ९६ हजार ५०० एवढी आहे. त्यापैकी दोन लाखाहून अधिक कर्मचारी हे भारतात कार्यरत आहेत.

कॉग्निझंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन हम्फ्रीज म्हणाले की, "सध्या जगभरात कोरोनाने अनेकजण चिंतेत आहेत. त्यामुळे सगळीकडे औदासिन्य पसरले आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने हे पाऊल उचलले असून आम्ही कर्मचाऱ्यांच्या पगाराचे योग्य व्यवस्थापन करण्याचे काम करीत आहोत."

ते पुढे म्हणाले की, गेल्या काही महिन्यात कंपनीतील कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, ही झीज आम्हाला भरून काढायची आहे. भारतात नोटीस पीरियड दोन महिन्यांचा होता. त्यामुळे यंदा भरतीच्या जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे.

कंपनीपुढील आव्हानांबाबत ते म्हणाले, कंपनी मल्टी-पार्ट योजना राबवित आहे. ज्यामध्ये करियरच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. प्रशिक्षण आणि नोकरीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आपल्या करिअरचा आणखी विस्तार करण्याची संधी मिळेल. तसेच कर्मचाऱ्यांसाठी त्रैमासिक पदोन्नतीच्या पद्धतीत बदल करण्यात येणार आहे आणि महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ आणि पदोन्नती देण्याबाबतचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे फ्रेशर्ससाठी ही एक चांगली संधी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar MI vs LSG : हंगामातील पहिल्याच सामन्यात अर्जुन झाला रिटायर्ड हर्ट, षटकही नाही केलं पूर्ण

MI vs LSG Live Score IPL 2024 : दमदार सुरूवातीनंतर मुंबईला हादरे; रोहितही झाला बाद

Raj Thackeray: ओवैसीसारख्यांचे अड्डे उध्वस्त करा; राज ठाकरेंचं महायुतीच्या जाहीर सभेत मोदींना साकडं

Lok Sabha Election 2024 : धुळ्यात भाजपचा गड कोसळणार? जाणून घ्या कसं असेल विजयाचं गणित

Climate Change On Malaria :  मलेरिया डासांच्या वाढीवर क्लायमेट चेंजचा थेट परिणाम होतोय, WHO ने दिला धोक्याचा इशारा

SCROLL FOR NEXT