jobs jobs
एज्युकेशन जॉब्स

राज्यात लवकरच महाभरती; MPSC अंतर्गत 15 हजार जागा भरणार

नामदेव कुंभार

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना भरतीच्या निर्बंधामधून सूट दिली असून गट ‘अ’ ते ‘क’ पर्यंतची एकूण १५ हजार ५११ जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी बुधवारी दिली. भरणे म्हणाले, ‘‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्‍त जागांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले घेतले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना जागा भरतीच्या निर्बंधांमधून सूट दिली आहे. तसेच गट ‘अ’ ची चार हजार ४१७ जागा, गट ‘ब’ ची आठ हजार ३१ आणि गट ‘क’मधील तीन हजार ६३ जागा अशा एकूण १५ हजार ५११ जागा भरण्यास अर्थ विभागाने २०१८ पासून मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने त्यांचे आरक्षण तपासून भरती गतीने राबविण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.’’

उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने ‘एमपीएससी’ सदस्यांच्या चार रिक्त जागा भरणे गरजेचे आहे. यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश दिले. याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यसंख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली, जेणेकरून भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) दरवर्षी पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्याच धर्तीवर ‘एमपीएससी’च्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan : यांचे खेळाडू चार दिवसांत निवृत्ती मागे घेतात, मग... ; पाकिस्तानच्या निर्णयाची सुनील गावस्करांनी उडवली खिल्ली

Green Salt : हिरवं मीठ म्हणजे काय? अचानक देशभर का होतंय ट्रेंड? पाहा घरच्या घरी कसं बनवायचं..

Deputy CM Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अजितदादांच्या पावलावर पाऊल! कराडात प्रीतिसंगमावर यशवंतरावांना केलं अभिवादन!

२००,००,००,०००! भारत-पाक सामना रद्द झाल्यास ICC ला बसणार मोठा फटका, पाकिस्तानकडून वसूल करणार ही रक्कम?

Viral Video : वैभव सूर्यवंशी भडकला, पाकिस्तानी फलंदाजाला घातल्या शिव्या; विहानने अडवलं नाहीतर झालाच असता मोठा राडा

SCROLL FOR NEXT