JEE Mains Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

JEE Mains द्वितीय सत्राच्‍या नोंदणीची 'या' तारखे पर्यंत मुदत

नॅशनल टेस्‍टींग एजन्‍सी (NTA) तर्फे जेईई मेन्‍स परीक्षेच्‍या द्वितीय सत्रासंदर्भात सूचनापत्रक जारी केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नॅशनल टेस्‍टींग एजन्‍सी (NTA) तर्फे जेईई मेन्‍स (JEE Mains) परीक्षेच्‍या द्वितीय सत्रासंदर्भात सूचनापत्रक जारी केले आहे. त्‍यानुसार इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना जुलै महिन्‍यात होणार्या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु असून अर्ज सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. २१ ते ३० जुलैदरम्‍यान जेईई मेन्‍सची द्वितीय सत्रातील परीक्षा पार पडणार आहे.

इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (IIT) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्‍स परीक्षा घेतली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या प्रवेशासाठी परीक्षेचे दोन सत्र आयोजित केलेले आहे. या दोन्‍ही सत्रांना प्रविष्ठ होण्याची संधी पात्र विद्यार्थ्यांना उपलब्‍ध असणार आहे. त्‍यानुसार जुलै महिन्‍यात होणार्या द्वितीय सत्राच्‍या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना येत्‍या ३० जूनच्‍या रात्री नऊपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. याच दिवशी रात्री ११ वाजून ५० मिनीटांपर्यंत निर्धारीत शुल्‍क ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे.

यापूर्वी पहिल्‍या सत्रातील परीक्षा दिलेल्‍या विद्यार्थ्यांना त्‍यांचा अर्ज क्रमांक (ॲप्‍लीकेशन नंबर) व पासपर्डचा वापर करुन लॉग इन करता येणार आहे. अशा विद्यार्थ्यांना पेपर, परीक्षेचे माध्यम, परीक्षा केंद्रासाठीचे शहर आदींबाबतची माहिती निवडता येईल.

गुरुवारपासून पहिल्‍या सत्राची परीक्षा

एनटीएतर्फे जेईई मेन्‍सच्‍या पहिल्‍या सत्रातील परीक्षा येत्‍या गुरुवार (ता.२३) पासून पार पडणार आहे. देशभरातील ५०१ शहरांमध्ये ही परीक्षा २९ जूनपर्यंत पार पडेल. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्‍या विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या परीक्षा केंद्राच्‍या शहराचा तपशील नोंदणीकृत ई-मेलद्वारे कळविण्यात आलेला आहे. ही केवळ परीक्षा केंद्राच्‍या शहराविषयीची माहिती असून, विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) हे स्‍वतंत्र्यरित्‍या संकेतस्‍थळावरुन प्राप्त करुन घ्यायचे आहे, अशी सूचना 'एनटीए'तर्फे दिलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT