Deendayal Sparsh Yojana Post Office esakal
एज्युकेशन जॉब्स

Good News : आता टपाल खाते विद्यार्थ्यांना देणार 'शिष्यवृती'; Bank Account वर जमा होणार 'इतके' रुपये

सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक मंडल स्तरावर फिलाटेलिक प्रश्नमंजुषा आणि मुद्रांक संकलन स्पर्धा आयोजित केली जाणार

सकाळ डिजिटल टीम

शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. स्पर्धेत भाग घेणारा विद्यार्थी हा मान्यताप्राप्त शाळेचा विद्यार्थी असावा.

बेळगाव : टपाल खात्याने विद्यार्थ्यांमध्ये स्टॅम्प संग्रहित करण्याची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी 'दीनदयाल स्पर्श योजना' नावाची शिष्यवृत्ती सुरु केली आहे. शालेय स्तरावर स्टॅम्प क्लब असलेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा (Scholarship) लाभ घेता येणार आहे.

टपाल खात्याकडून मिळणारे फिलाटेलिक स्टॅम्प संग्रहित करण्याचा छंद अनेक विद्यार्थ्यांमध्ये आहे. एक छंद म्हणून तो पुढे कायम ठेवण्यासाठी आता टपाल खात्यानेही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (Deendayal Sparsh Yojana Scholarship) देण्याचा निर्णय घेतला आहे.

सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक मंडल स्तरावर फिलाटेलिक प्रश्नमंजुषा आणि मुद्रांक संकलन स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या आधारे २०२३-२४ या वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल. वार्षिक ६ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार असून दरमहा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या संयुक्त बँक खात्यावर ५०० रुपयाप्रमाणे शिष्यवृत्ती जमा केली जाणार आहे.

या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. स्पर्धेत भाग घेणारा विद्यार्थी हा मान्यताप्राप्त शाळेचा विद्यार्थी असावा. तसेच त्या शाळेतील फिलाटेलिक क्लबचा सदर विद्यार्थी सदस्य असावा. शिष्यवृत्तीला पात्र ठरण्यासाठी २०२३ च्या वार्षिक परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळविलेले असावे.

बेळगावमध्येही काही शाळांमध्ये असे क्लब असून बेळगावतील विद्यार्थी त्यासाठी पात्र ठरणार आहेत. अधिक माहिती टपाल खात्याच्या www. karnatakapost.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

५० प्रश्नांची स्पर्धा

स्टॅम्प संकलनाची प्रश्नमंजुषा स्पर्धा ५० प्रश्नांची असेल. बहुपर्यायी उत्तर असलेले प्रश्न विचारले जाणार असून यात चालू घडामोडी, इतिहास, विज्ञान, क्रीडा, संस्कृती, भूगोल विषयासह पोस्टल स्टॅम्प, संगणकसंबंधी विषय असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT