Shivaji University esakal
एज्युकेशन जॉब्स

Shivaji University : 'या' कारणामुळं शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित; कधी घेतली जाणार Exam? जाणून घ्या

सोमवारपासून परीक्षा पूर्ववत सुरू होण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

भारतीय हवामान खात्याने विद्यापीठ परिक्षेत्रातील या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या इशारामुळे शिवाजी विद्यापीठाने (Shivaji University) गुरुवार, शुक्रवारी होणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवार, रविवारची सुटी असल्याने सोमवारपासून या परीक्षा पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने विद्यापीठ परिक्षेत्रातील या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे विद्यापीठाने बुधवार आणि गुरुवारच्या परीक्षा स्थगित केल्या होत्या.

त्यामध्ये आणखी एका दिवसाची वाढ केली आहे. त्यानुसार शुक्रवारी होणाऱ्या बी. टेक., बी. फार्मसी., एमबीए., एमसीए या अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. त्यासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३४०० इतकी आहे.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाने आज एम. जे., एम. ए. सोशालॉजी., इनऑरगॅनिक केमिस्ट्री अभ्यासक्रमांच्या सहा परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. मार्च-एप्रिल सत्रातील एम. फिल., प्री पीएचडी कोर्सवर्क अभ्यासक्रमाच्या परीक्षा पूर्वनियोजनानुसार ७ ऑगस्टपासून सुरू होणार होत्या. त्यामध्ये आता बदल केला आहे. या परीक्षा आता २८ ऑगस्टपासून सुरू होतील, अशी माहिती परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले.

या अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित

बी. टेक., बी. फार्मसी., एमबीए., एमसीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT