english
english  
एज्युकेशन जॉब्स

तुम्हालाही इंग्लिश बोलण्याची भीती वाटते का? मग ही ५ पुस्तकं जरूर वाचा आणि करा सर्वांना चकित

सकाळ डिजिटल टीम

नागपूर  : आपल्यापैकी अनेक जणांचे दूर देशात जाण्याचे आणि तिथेच स्थायिक होण्याचे स्वप्न असते. मात्र अनेकजण आपला ही स्वप्ने एका कारणासाठी बाजूला ठेवतात. ते कारण म्हणजे इंग्लिश बोलण्यात नसलेला आत्मविश्वास किंवा इंग्लिशची भीती. अगदी लहानपणापासूनक आपण इंग्लिश शिकतो आणि ऐकतो आणि बोलायचा प्रयत्न करतो. मात्र आपण ती सहजपणे बोलू शकत नाही. मात्र आता घाबरू नका. आम्ही तुम्हाला काही पुस्तके सांगणार आहोत जी वाचून तुम्ही सहज इंग्लिश ऐकू, बोलू आणि लिहू शकणार आहात. चला तर मग जाणून घेऊया.    

द एलिव्हेट सिरीज (The Elevate Series by Shefali Ray, Samathmika Balaji and Simran Luthra)

पुस्तकांच्या या सिरीजमध्ये तीन पुस्तकं आहेत. यामध्ये प्रारंभ, मध्यम आणि पूर्व मध्यम अशे तीन स्तर आहेत. CEFR नावाच्या आंतरराष्ट्रीय लँग्वेज फ्रेमवर्कनुसार या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहेत. ही पुस्तक वाचणाऱ्याच्या सर्वांगीण विकासात ही पुस्तकं मदत करतात. इंग्लिश बोलणे, ऐकणे आणि लिहिणं अगदी सोप्या पद्धतीनं शिकण्यासाठी ही पुस्तकं मदत करतात. या पुस्तकांमध्ये भरपूर सराव आणि स्वाध्याय आहेत ज्यामुळे तुम्ही इंग्लिश शिकू शकता. 

स्पोकन इंग्लिश फॉर माई वर्ल्ड (Spoken English for My World by Sabina Pillai)

काही लोकांना इंग्रजी वाचणे आणि लिहिणे चांगले जमते मात्र बोलण्यात समस्या येते. या पुस्तकाद्वारे इंग्लिश बोलण्यातही प्रभुत्व मिळवू शकणार आहात. हे पुस्तक ऑडिओ आणि व्हिडिओ फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे. ज्या लोकांना दैनंदिन जीवनात इंग्रजी बोलायचे आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप चांगले स्त्रोत आहे.

कॉमन एरर्स इन एवरीडे इंग्लिश (Common Errors in Everyday English by Saumya Sharma)

या पुस्तकात केवळ सामान्य चुकांचाच समावेश नाही तर त्यात काही शब्दही आहेत ज्यांचा आपण चुकीचा उच्चार करतो. त्यामध्ये वारंवार व्याकरणातील चुका देखील समाविष्ट असतात. हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक, तथ्य तपासणी संसाधन आणि सहज वापरण्यायोग्य संदर्भ साधन म्हणून काम करेल ज्यामुळे तुम्हाला सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकण्यात मदत होईल. 

बी ग्रैमर रेडी (Be Grammar Ready by John Eastwood)

या पुस्तकात भारतीय वाचकांच्या गरजा विचारात घेतल्या आहेत. त्यानुसार व्याकरणाचे अद्ययावत नियम दिले आहेत. व्याकरणाचा वापर देखील चांगल्या प्रकारे समजवून सांगण्यात आला आहे. सराव करण्यासाठी अनेक स्वाध्याय दिले गेले आहेत. व्याकरणातील 170 हून अधिक विषय यात समजवून सांगण्यात आले आहेत. 

आईईएलटीएस जनरल ट्रेनिंग (The Definitive Guide to IELTS General Training)

आयईएलटीएस (आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषा चाचणी प्रणाली) लक्षात ठेवून हे पुस्तक खास बनवले गेले आहे. यामध्ये चारही विभागांचे वाचन, लेखन, ऐकणे आणि बोलण्याच्या चाचण्या यात दिल्या गेल्या आहेत.

संकलन आणि संपादन  - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT